मुलांची विविध कौशल्ये, आत्मसात करण्यासाठी ती सर्वच कौशल्ये पालकांनी येण्याची गरज नसते पण पळक्च मलाच यातील काही माहीत नाहीचा पाढा वाचतात व मग मुले पण पालकांच्या कुवतीचा अंदाज घेतात. मुलांच्या या प्रवासात प्रमुख भूमिका आई वडिलांची असते. त्यानंतर आजी आजोबा नंतर भावंडे यानंतर शेजारी व सभोवतालचा समाज.
अगदी लहान वयाच्या मुलांना 5 वर्षाच्या आतील स्वछता, नीट-नीटकेपणा याचे धडे दिल्यास चांगल्या सवयी लागतात. ५ ते ७ वयाच्या मुलांच्या बंधन घालावे लागते. आक्रास्तळेपणावर बंधन घालणे, खोटे बोलण्यावर, मत्सर, स्वार्थीपणा, एकलकोंडेपणा, तर पुढील बाबींना प्रोत्साहन दिल्यास स्वभावाला शरीराला चांगले वळण लागते. शारीरिक सुरक्षितता, स्वछता स्वत:ची व परिसराची, घराची भावंडांना मदत करणे, वस्तु जागेवर ठेवणे .
१२ वर्षा नंतरच्या मुलांचं व्यक्तिमत्व विकसित होण्यासाठी पालकांना फारच जागरूक राहणे महत्वाचे आहेत. उदाहरण दाखल जसे आत्मप्रतिमा, महत्वाकांक्षा, निर्णयशक्ती, कार्यक्षमता, शारीरिक स्वास्थ, मानसिक आरोग्य व अशाचे प्रकारचे महत्वाचे २०-२२ मुद्दे तर आपल्याला विचारात घ्यावे लागतील