वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच प्राचिन शास्त्र आहे. दिशा, ऊपदिशा, दिशांच्या देवता, सर्वच दिशांकडून येणार्या चुंबकीय लहरी, वैश्विक किरणे या सर्व बाबींचा येथे अभ्यास केलेला आहे. जागेतील दोषांचा परिहार करण्यासाठी विविध प्रकारचे शांतिविधी, मंत्र व रत्नांचा वापर करता येतो.
कांही व्यक्तींच्या कुंडलीत ग्रह उत्तम दर्जाचे असूनही जीवन कष्टमय झालेले असते. कुटुंबातील सर्वांच्या कुंडल्या पाहून असे लक्षात येते की विशिष्ट वास्तूदोष प्रत्येकाच्या कुंडलीत आलेला दिसतो आणि मग कितीही वास्तू बदलल्या तरीही परिस्थितीत फारसा बदल होत नाही. तेव्हा वास्तूचा विचार करावा लागतो. कोणतीही तोडफोड न करता करण्यात येणारे उपायही लागू पडतात.
वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते विधी, विशिष्ट खोल्यांना विशिष्ट रंगाचा वापर, पडदे लाईटचा प्रकाश, सोफा फर्निचरची कव्हर्स, भिंतीवर लावावयाच्या फ्रेम्स व्हरांडा टेरेस गँलरी यांना आवश्यक त्या रंगांच्या टाईल्स कींवा अगदी मँटचा वापर इत्यादी बदल केल्यास दोषांचे निराकरण होते.