वास्तविक शालेय बालवयातच या मनाच्या श्लोकांची शिकवण जर व्यवस्थित मिळाली तर तरुण वयात मानवाला इतक्या कटकटींना व अराजकतेला सामोरे जावे लागणार नाही.
समर्थ रामदासांची वाण्ड्मय संपदा अफाट आहे. ३५ ते ४० हजार ओव्या भारतील एव्हडे साहित्य आहे. जसे – करूनअष्टके, आत्माराम, मनाचे श्लोक, मान पंचक, मानसपूजा, राजकीय पत्रव्यवहार, दासबोध, चौदा ओवी शतके, डेविदेवतांच्या आरत्या, अध्यात्म हा विषय मुख्य ठेवून प्रपंच, स्थापत्य शास्त्र, संगीत, वेदांत, व्यवस्थापन, बँकिंग, कुटुंबनियोजन, समाजकारण, अशा अनेक मनाच्या श्लोकात फक्त २०५ श्लोका मधून मानवाच्या जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श केला आहे. आचार्य विनोबा भावेनी याच मनाच्या श्लोकांना “मानोपनिषद” असेच नावाजले आहे. मनाच्या श्लोकांद्वारे प्रयत्नपूर्वक आपल्याला मनोविकास साधता येतो.
मनाच्या श्लोकातून त्यांनी कर्मयोग, भक्ति योग, ज्ञानयोग, सदाचार, सत्संग, सगुण – निगुण, नामस्मरन, ध्यान, अनेक विषयात स्पष्ट केले आहेत.