narali purnima rakshabandhan

श्रावण सोमवार, नारळी पूर्णिमा व रक्षाबंधन २०२० (त्रिवेणी संगम)

३ ऑगस्टला श्रावण पौर्णिमा आहे. योगायोगाने श्रावणातील सोमवारही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीतील भाऊबहिणींच्या प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधनही सण आहे. फक्त भाऊ-बहीणच नाही तर संपूर्ण समाजानेच एकमेकास स्नेहबंधन बांधण्याचा सण होय. इथे जातपात, धर्म, श्रीमंत गरीब हा भेदभाव गळून पाडणारा हा सोहळा आहे. म्हणूनच रक्ताच्या नात्याचे असो वा नसो मानलेले  बहिण-भाऊ सुद्धा एका नाजूक धाग्याने बांधले जातात. वास्तविक असे सण वैश्विक सण म्हणून साजरे करायला पाहिजेत. Read More

कृष्णमूर्ती पद्धतीने व्यवसायाबाबतचा अभ्यास

वास्तविक मला कृष्णमूर्तीवरचा पहिला लेख हा नक्षत्रांच्या माहितीवर लिहायचा होता. पण बर्‍याच जणांचे फोन आले की सध्या कोरोनाच्या काळात व्यवसाय, नोकरीतील अडचणी यांवर काही माहिती द्या. म्हणून हा आजचा लेख कोरोनाच्या काळात आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण कोणते व्यवसाय करू शकतो हे बघुया.

Read More

मकर रास श्रवण नक्षत्र : या दिवशी उद्योगाच्या विचारांचा शुभारंभ करा

श्राव़ण महिन्यातील श्रावणी पौर्णिमा,  म्हणजेच रक्षाबंधनाचा व सागर पूजनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी मकर रास असून रविचे उत्तराषाढा हे नक्षत्र सकाळीच ७ वाजून १८ मिनिटांनी संपतेय व चंद्राचे श्रवण हे नक्षत्र सुरू होतेय.  बरं झालं उत्तराषाढा संपतेय ते. कारण रवि व शनि हे काही नैसर्गिक मित्र नाहीत. त्यामुळे या दिवसाची फळे काही फारशी समाधानकारक मिळालीच नसती.

Read More