business to do in sun transit

चला संधीचे सोने करूया | कोणता व्यवसाय करू शकता ते बघुया

Read In

 

** चला संधीचे सोने करूया ** 

नमस्कार मित्रमैत्रिणींनो…

“ चला काय करायचे याचा विचार करूया. “ या बाबतीत आता तुमचा बर्‍यापैकी विचार झाला असेल म्हणून त्याच विषयावर जरा चर्चा करूया.

business to do in sun transit

संदर्भ :– 1) चित्रा नक्षत्रातातील रवीचा प्रवेश शनिवारी 13:33.

2)तूळ राशीतील रवीचा प्रवेश शनिवारी सकाळी 07:05

रवीची व मंगळाची कार्यक्षेत्रे आपण पाहिलेली आहेत. आता अगदी ग्राउंड लेवलवर आपल्याला काय  काय करता येईल व या रवी मंगळाचा कसा उपयोग होईल हे बधुया. नवरात्र, दसरा, दिवाळी आता अगदी तोंडावर आलीय. कोरोनाच्या या संकटामुळे कोणी फार मोठा उत्सव करणार नाही पण लेकराबाळांसाठी थोडातरी सण करणार, गोडधोड करणार, त्यांना कपडे घेणार थोडीशी तरी मौजमजा करणार मग यापैकी तुम्ही कोणता व्यवसाय करू शकता हे तुम्हाला सुचवावस  वाटतय म्हणून हा सर्व खटाटोप.

.))   वृषभ मृगशीर्ष चरण 1 व 2..  /   मिथुन मृगशीर्ष चरण 3 व 4.:– मृगशीर्ष नक्षत्राच्या मदतीने करता येणारे उद्धोग बघुया.

चित्रा नक्षत्र हे सेवागुणी असल्याने लोकाना घरबसल्या, वस्तू घरपोच देऊन त्यांची सेवा व सोय करणे.

जागेचे एजंट, फळे , दैनंदिन उपयोगाच्या वस्तु जसे स्नो पावडर, मेकअपचे साहित्य., केसाचा रंग, टूथपेस्ट, टूथब्रश,  स्टेशनरीचा साहित्य, धान्याची किरकोळ विक्री, जसे रवा मैदा साखर, लाडूचे मिठाईचे साहित्य, अगदी मिठाईसुद्धा, चित्रा नक्षत्रांतर्गत पोस्टमन, प्रिंटींग, छापखाना येत असल्याने आपण शुभेच्छा कार्डेही घरपोच देऊ शकतो.

ब)) कन्या चित्रा चरण 1 व 2 /तूळ चित्रा चरण 3 व 4:–आता प्रत्यक्ष चित्रा नक्षत्राचे कोणते उद्धोग करता येतील ते बघुया.

सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तु, भरजरी किंवा चांगले मौल्यवान कपडे साड्या पैठणी, फँशनेबल दागिने, अत्तर, परफ्युम्स, डिओ, व किरकोळ धान्य. घर सजावटीच्या वस्तु, विजेवर चालणारे दिवे व ईतर वस्तु कलाकुसरीच्या वस्तु, सुगंधी द्रव्ये, व खेळाचे साहित्य.

क)) मकर धनिष्ठा चरण 1 व 2,  /  कुंभ धनिष्ठा चरण 3  व 4 :–

मातीच्या वस्तू व प्रत्यक्ष माती, सिमेंटच्या वस्तू व प्रत्यक्ष सिमेंट, ज्यूंटच्या वस्तू,  फँशनेबल वस्तू,   सर्व प्रकारची खाण्याची तेले, लोकरीच्या वस्तू  व खेळणी, धातूची भांडी व वस्तू, चामड्याच्या वस्तू,  धान्य, वेगवेगळ्या प्रकारचा चहा व काँफी पावडर,

मेष व वृश्र्चिक :–दारूकाम, शोभनीय फटाके, अँसिड,  रसायने, शेंगदाणे, बटाटे व इतर कंदमुळे, उष्ण, तिखट पदार्थ, आचारी, घड्याळे मशीन दुरूस्ती, खेळाचे साहित्य,  विविध मसाले, मद्धासारखी उत्तेजक पेये, गुळ, साखर, सुपारी, कापूस, मोहरी, अल्कोहोल.

या यासारखे उद्धोग आत्ता या 10 आँक्टोबर ते 23 आँक्टोबर पर्यंत सुरू केले तर पुढे कायमस्वरूपी हा उद्धोग चांगला चालेल. बघा संधी दार ठोठावतेय दार उघडून संधीचे स्वागत करा.

|| यशस्वी भव ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *