Read In
शनिवार १० आँक्टोबर 2020 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

आज शनिवार १० आँक्टोबर, चंद्र मिथुन राशीत १९:०८ पर्यंत असून नंतर कर्क रास सुरू होत आहे. चंद्र नक्षत्र पुनर्वसू पर्यंत असून नंतर पुष्य नक्षत्र सुरू होत आहे. तरी या कालावधीचा विचार करून हे व आजच्या पहाटेच्या ०५:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज दुपारी १३:३३ वाजता रविचा चित्रा नक्षत्रात प्रवेश होत असून २३ तारखेपर्यंत आहे. चित्रा हे नक्षत्र मंगळाचे असून ते तूळ राशीमधे येथे. रवी व मंगळ ही जोडी सरकारी कामासाठी लाभदायक आहे. तूळ राशीच्या मंडळीनी आपली अडलेली सरकारी कामे कशी व कधी करावीत याचा सल्ला तज्ञांकडून घेऊन या कालावधीचा फायदा घ्यावा. मेष, कर्क, वृच्छिक व तूळ या राशीना हा कालावधी फलदायी आहे. कालावधी :–( शनिवार १० आँक्टोबर ते शुक्रवार २३ आँक्टोबर.)
मेष :– पूर्वीपासून अडलेल्या सरकारी कामकाजास प्राधान्य द्या. बौद्धिक क्षेत्रातील मंडळींना मान सन्मान मिळेल. पोलिस खाते, होमगार्ड, राजकिय पदाधिकारी यांतील पदाधिकार्यांना अतिशय महत्वाची व समाजाच्या उपयोगाची कामे करता येणार आहेत.
वृषभ :–कोठेही मोठेपणा वा दादागिरी दाखवण्याचा प्रयत्न करू नका. अंगलट येईल. न्यायालयातील अधिकारी वर्गाने अधिकाराचा वापर योग्य मार्गाने होत असल्याची खात्री करून घ्यावी. प्रेमाच्या व्यवहारात अडचणी निर्माण होतील तरी शांत रहावे.
मिथुन :–, मान. न्यायाधिश, वकिल , पिठासेन अधिकारी व सरकारी क्षेत्रातील क्लास वन आँफिसर्सना कामाचा बोजा आवरता आवरणार नाही. समुपदेशकांनी वेगवेगळ्या किचकट प्रकारच्या समस्यांचे निराकरण करावे लागेल.
कर्क :–मनातील शक्तीच्या व हिमतीच्या जोरावर मोठे काम करून दाखवाल. व्यवसायातील अडथळे दूर होण्याचे मार्ग सापडतील. महिलांच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल. विद्यार्थी वर्गाने आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीचे योग्य ते नियोजन करावे.
सिंह :–तुमच्याच राशीचा स्वामी रवी हा धडाडीकरक मंगळाला बरोबर घेऊन येत असल्याने जग जिंकण्याची जिद्द ठेवा. प्रेमाच्या व्यवहारात नियमांचा तराजू लावू नका. अधिकारांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्या. कुटुंबात वादग्रस्त विषयांवर चर्चा करू नका.
कन्या:- सरकारी नियम काटेकोर पाळा. नियमबाह्य कामे करू नका. आपल्या मुलांच्या खर्चावर लक्ष ठेवा. दुसऱ्यांना नियम लावण्याच्या सवयीमुळे स्वतः अडचणीत याल. संशयी वृत्ती दूर करून कामातील व्यवहाराकडे डोळसपणे बघा.
तूळ:- तुमच्याच राशीच्या चित्रा नक्षत्रातील मंगळ हा तुम्हाला फायदा व नुकसान दोन्ही करून देणारा आहे तरी तज्ञांच्या सल्ल्यानेच सरकारी कामे करा. वाहन नियमांचे काटेकोरपणे पालन करा. राजकीय लोकांना कडवा विरोध करू नये.
वृश्चिक:- अति धाडसाने बेधडकपणे कोणत्याही कामात हात घालू नका. कामे करू नका. संप, गटबाजी, सरकार विरोधी कारवाया यांच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ नये.वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.
धनु:- तुमच्या कार्यपद्धतीतील प्रामाणिकपणा, परदर्शकपणा व सचोटी यांमुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. सरकारी नोकरीतील कर्मचाऱ्यांना एखादी मनाची जागा मिळेल. सर्व कामे नियमांच्या आधीन राहूनच करा. ज्वालाग्राही पदार्थांपासून सावध राहा व लहान मुलांनाही सांभाळा.
मकर:- सरकारी प्रलंबित कामासाठी एखादा दंड भरावा लागेल. तज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही सरकारी काम करू नका. कुटुंबात जोडीदाराबरोबरील वाद विकोपाला जाऊ देऊ नका. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.Tउंची वडिलांना आज प्रवासाची परवानगी देऊ नका.
कुंभ:- शांत व संयमाने वागल्यास अडचणींचा त्रास होणार नाही. नोकरीतील वरिष्ठांना वस्तुस्थिती स्पष्ट करा. कोणाचेही सल्लागार बनू नका. सरकारी योजनांच्या लाभासाठी प्रयत्न करा. महत्त्वाची सरकारी माहिती उघड करू नका
मीन:- सरकारी कामे मार्गी करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घ्या. व्यवसायातून अचानक धनलाभ होईल.नियमांचे काटेकोरपणे पालन करा. कोणासाठीही कोर्टाची पायरी चढू नका. सरकारी योजनांतून होणाऱ्या लBहासाठी प्रयत्न करा.
l शुभं भवतु l