बुधवार 11 नोव्हेंबर 2020.
शुक्रवार 13 नोव्हेंबर ते सोमवार 16 नोव्हेंबर. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज.

या वर्षी दीपावलीचा सोहळा हा चार दिवसांचा आहे. त्यातील प्रत्येक दिवसाचे महत्व, त्याच्यामागे असलेली भावना व त्यातून समाजाचे साधायचे हित याचा विचार करूया. दीपावली हा आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा करून प्रकाशाकडे नेणारा सण आहे.
आश्र्विन कृष्ण द्वादशीपासून(12 नोव्हेंबर गुरूवार ते 16 नोव्हेंबर सोमवार पर्यंत) कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत पांचदिवस पूर्वरात्री कुटुंबातील पुरुषास निरांजनाने ओवाळावयाचे असते. यासच निरांजन विधि असे म्हणतात. देव, ब्राह्मण, घाई, घोडे, ज्येष्ठ, श्रेष्ठ, लहान या सर्वांना मातेच्या जागी असलेल्यां स्त्रीयांनी निरांजनाने ओवाळावे.
धनत्रयोदशी
तसेच त्रयोदशीला 13 नोव्हेंबर शुक्रवार रोजी प्रदोष काळी घराबाहेर यमाला दीप द्यावा. त्यामुळे कुटुंबातील अपमृत्युचा नाश होतो. त्याचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे.
“||मृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामया सह ||त्रयोदश्यां दीपदानात्सूर्यजः प्रीयतां मम ||”
नरकचतुर्दशी
आश्र्विन कृष्ण चतुदर्शी 14:18 पर्यंत.(14 शनिवारी.) स्वाती नक्षत्र 20:09 पर्यंत. असल्याने ज्यांना ऐंश्र्वर्याची ईच्छा आहे पहाटे सुगंधि तेलाने अभ्यंग करून स्नान करावे. शनिवारी संध्याकाळी दीवे लावावे व नंतर ब्रह्मा, विष्णु व महेश यांच्या मंदिरात किंवा मठातही दीवे लावावेत. या दिवशी दीप लावताना नरकासुराच्या उद्देशाने चार चार वातींचे दीवे लावावे.
लक्ष्मीपूजन
आश्र्विन अमावास्येच्या दिवशी लहाल बाळ व रोगी यांच्याशिवाय इतरांनी भोजन करू नये. प्रदोष काळी म्हणजे 17:59 ते 20:32 या वेळेत लक्ष्मीपूजन करून नंतर यथाशक्ती देवालयात, इतरत्र दीप लावावेत. यानंतर यथाविधी लक्ष्मीपूजन करून पांढरे वस्त्र घालून व अलंकार धारण करून भोजन करावे.
प्रदोष काल हा कर्मकाल असल्याने व लक्ष्मी ही मध्यरात्री घरांत येऊन राहते म्हणूनघरे फुलांनी रांगोळ्यांनी सजवावीत घरापुढे दिप लावावेत. घरातील मंडळीनी जागे राहून उत्सव करावा. याप्रमाणे मध्यरात्र संपत असताना, डोळ्यावर झोप आलेली असताना स्त्रीयांनी वाद्धाचा आवाज करू सूप वाजवून अलक्ष्मीला गावाबाहेर घालवावे व अशी पूर्वी प्रथा होती व त्यामुळे लक्ष्मी स्थिर होती. आजही आपण निदान मध्यरात्री पर्यंत जागरण करू घरातील दिवे सुरू ठेवून लक्ष्मीला घरी प्रवेश करण्यास प्रसन्न वाटेल असे मंगलमय व शुचिर्भूत वातावरण ठेवू शकतो.
बलिप्रतिपदा पाडवा
आश्र्विन अमावास्या रविवारी सकाळी 10:37 ला संपत असून कार्तिक शुक्ल प्रतिपदा सुरू होत आहे. प्रतिपदा 16 सोमवार रोजी सकाळी 07:06 पर्यंत आहे. या प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. बलिप्रतिपदेच्या कथेमध्ये आपला शेतकरी बळीराजाची दानशूरता पाहून श्रीविष्णू खूप आनंदी झाला व त्याला एक वर दिला. “ जो कोणी बलिप्रतिपदा दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. व त्याच्या घरी लक्ष्मी स्थिर राहील. ”या हे पाहून श्री लक्ष्मीला श्री विष्णुचे कौतुक वाटले म्हणून श्रीलक्ष्मीने पती विष्णूचे औक्षण केले. श्रीविष्णूने पण हिरे, माणके, ओवाळणी म्हणून घातले. यामुळेच आजही पत्नी पतीला निरांजनाने ओवाळतो व पती पत्नीला भेटवस्तू देतो.
यमद्वितीया भाऊबीज
कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमुनेने आपल्या घरी यमाचे पूजन करून भोजन दिले. म्हणून या द्वितीयेला यमद्वितीय म्हणून ओळखले जाते. म्हणून या द्वितीयेला पुरुषांनी आपल्या घरी भोजन करू नये. बहिणीच्या हातचे भोजन करावे व बहिणीला सोन्याचे दागिने, वस्त्रे देऊन सत्कार करावा. या द्वितीयेला यमुनेने बहिणीच्या नात्याने देव यमराजला भोजन दिले त्याच तिथीला जो मनुष्य बहिणीच्या हातचे भोजन करतो त्याला उत्तम सुखे प्राप्त होतात. तसेच याच दिवशी जी स्त्री भावाला भोजन व विडा देऊन त्याची पूजा करते तीळ कधीही वैधव्य प्राप्त होत नाही व भावाचे आयुष्यही क्षय होत नाही. बहीण व भाऊ यांनी याच दिवशी यम चित्रगुप्त व यमदूत यांची पूजा करून त्यांना अर्घ्यही द्यावे.
टीप:-गुरूजींशिवाय लक्ष्मीपूजनाचा विधी कसा करावा यासाठी गुरूवार 12 नोव्हेंबरचा लेख वाचा.