daily horoscope

दैनिक राशीभविष्य बुधवार 11 नोव्हेंबर 2020

Read In

 

बुधवार 11 नोव्हेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

आज चंद्ररास सिंह दुपारी 12:00 पर्यंत नंतर कन्या. चंद्र नक्षत्र सकाळी 06:27 पर्यंत पूर्वा फाल्गुनी व नंतर उत्तरा फाल्गुनी सुरू होत आहे. या दोन्ही नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज रमा एकादशी आहे. महिलांना त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत केले जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनोभावे पूजा करून भगवान श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप केला असता इच्छित फलप्राप्ती होते.

मेष :– मी म्हणेन तो कायदा या स्वभावाला आज मुरड घालावी लागेल. सण समारंभ कसा साजरा करावयाचा याबाबत कुटुंबातील सर्वांचे मत घेणे जरुरीचे ठरेल. जुनी पुराणी गुंतवणूक आश्चर्यकारक लाभ देईल. पायाला झालेली जूनी जखम पुन्हा त्रासदायक होईल.

वृषभ :–महिला माहेरील मंडळींसाठी मोठे व मनपसंत शाँपिग करतील. तुमच्या वागण्यातील पारदर्शकपणा तुमची प्रतिष्ठा वाढवेल. शिक्षक मंडळीना आजचा दिवस मोठा आदरसत्काराचा राहील.कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी सुनबाईवर एकदम खूष होणार आहेत.

मिथुन :–डाँक्टर मंडळी आपल्या कामामुळे खूप दमणार आहेत. कपड्याच्या व्यापार्याना अचानक नुकसान होत असल्याचे जाणवेल. तरी लहानसा उद्धोग असलेल्यांनी फार मोठी गुंतवणूक करू नये. वयस्कर मंडळीनी आपला चष्मा मोबाईल सांभाळावा हरवण्याची शक्यता आहे.

कर्क :–तरूणांना आपल्या मनासारखी खरेदी करता येईल. विजेच्या मशीनवर काम करणार्‍यांनी विशेष काळजी घ्यावी विजेचा शाँक लागण्याचा धोका आहे. लहान मुलांच्या हाताला लागतील अशा ठिकाणी टोकदार वस्तू किंवा नाणी, गोट्या ठेवू नका. तोंडात घालण्याचा आज फार मोठा धोका आहे.

सिंह :- आजचा दिवस अविस्मरणीय अनुभवाचा राहणार आहे. निवडक व महत्वाच्या लोकांमधे प्रशिक्षणासाठी तुमचा नंबर लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही कामातील चतुराई बघून वरिष्ठ खूष होतील. बुद्धी चातुर्याने इतरांची मने जिंकला.

कन्या :–गेले आठवडाभर आजारी असलेल्यांना आज दुपारनंतर आराम पडू लागेल व काळजीचे कारण उरणार नाही. तरूण वर्गाकडून नोकरीतील नित्याच्या कामातही नवनवीन प्रयोगांचा वापर करण्यात येईल. सहकारी त्यावर अतिशय खूष होतील.

तूळ :–समाजात वावरताना तुमची दोन रूपे समोर येतील. मेणाहूनही मउ व वज्रासारखे कडक असा अनुभव सहकारी वर्गास येईल. नोकरीतील कोर्टाच्या कामासाठी दुसरा गावी जाणे भाग पडेल. महिलांना ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो तरी कोणत्याही विषयाचा बाऊ करू नये.

वृश्र्चिक :–गेल्या महिन्यापासून असलेली पाठदुखी आजच्या दुपारनंतर कमी होत असल्याचे जाणवेल. प्रवासात महत्वाच्या कागदपत्रांची बँग नजरचुकीने बदलली जाईल तरी सावधपणा महत्वाचा आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणासाठी मित्राकरीता मोठ्या हाँस्पिटलला जावे लागेल.

धनु :–मुलींना व तरूण तरूणांना डान्स काँम्पिटीशनमधे चांगले सादरीकरण करता येईल व त्यांचे कौतुकही होईल. व्यवसायात नविन गुंतवणूकीची गरज निर्माण होईल. मुलांना आजोळी जाण्याचे प्रसंग येथील किंवा आजोळच तुमच्याकडे येईल.

मकर :–सांधेदुखी च्या वयस्कर मंडळीना अचानक त्रास सुरू होईल. सरकारी योजनांतून मिळणार्‍या कामाचे मानधन मिळण्याचे संकेत मिळतील. आई वडीलांसाठी महत्वाची व उंची किंमतीची वस्त्रांची खरेदी कराल. तरूणांना अती उत्साहात धावपळीत एखादी लहानशी दुखापत होण्याचा धोका आहे.

कुंभ :–नवीन घराचे पझेशन नियोजित वेळेत मिळणार नाही विलंब होणार आहे. व्यावसायिकांना बँकेच्या कर्जाचे प्रकरण मार्गी लागत असल्याचे कळेल. नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना अजूनही वाट पहावी लागणार आहे.थोरांच्या दुःखी मनात उर्जा निर्माण करण्यात यशस्वी व्हाल.

मीन :– कोचिंग क्लासेसच्या शिक्षकांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागेल. अचानक जून्या मित्रांची भेट होईल व मनातील कोंडलेल्या प्रश्र्नांना आज बाहेर काढता येईल. पायाच्या जखमेत चांगली सुधारणा होईल. दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना आराम पडू लागेल व डिसचार्ज मिळेल.

|| शुभं-भवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *