daily horoscope

दैनिक राशीभविष्य 12 डिसेंबर 2020

Read In

 

शनिवार 12 डिसेंबर 2020 चे दैनिक राशीभविष्य

कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश.

daily horoscope

शनिवार 12 डिसेंबर आज चंद्ररास तूळ 22:41 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र पहाटे 06:30 पर्यंत स्वाती व नंतर विशाखा 28:04 पर्यंत. वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी उत्सव (आळंदी)

मेष:–मी व माझे कुटुंब एवढेच मर्यादित विचार राहतील. अपत्यप्राप्तीच्या संदर्भातील विषय निर्णयापर्यंत येण्यासाठी आवश्यक ती सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. दत्तक संततीचा लाभासाठी योग्य कालावधी आहे.

वृषभ :– सकाळपासूनच कामाची घाईगर्दी होणार आहे. व्यावसायिकांनी आर्थिक देवघेव करताना आपल्या अचुक अंदाजांना विचार करावा. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवावे लागेल पण आर्थिक विचारही पक्के करावेत.

मिथुन :–श्री गुरूमाऊलीच्या आशिर्वादाने अध्यात्मिक अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल. अध्यात्माचा अनुभव व माहिती नसलेल्यांचे कुतूहल जागे होऊन अभ्यास करावासा वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ होईल तरी आज मेहनत करू नका.

कर्क :–नोकरीतील क्लीष्ट कामांचा आज फारच त्रास जाणवेल. कामातील कोणतेच आज शाँर्टकटस वापरू नका. बँकेच्या कामातील अडचणींवर तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणजे पुढील भानगडी किंवा कटकटी निर्माण होणार नाहीत.

सिंह :–पाठीच्या मणक्यांच्या त्रासदायक बाबींवर लवकरात लवकर इलाज करावा लागेल. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष का लागत नाही याचा स्वतःच विचार करावा. इतरांना दोषी धरू नये. लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्र्न मानसिक त्रास देतील.

कन्या:–अपेक्षित लोकांच्या गाठीभेटी होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांनी आपल्याला नक्की काय पाहिजे आहे हे ठरवावे. वयस्कर मंडळीना सांधेदुखी तसेच ब्राँकायटीसचा त्रास संभवतो तरी काळजी घ्यावी. अचानक जूने ये णे वसूल होईल.

तूळ :– प्रकृतीच्या कटकटींपेक्षा मानसिक त्रास वाढेल. स्त्रीयांचा आज हार्मोनल चेजेंसचा त्रास वाढणार आहे.लहान लहान गोष्टींवर चिडचीड वाढेल व रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा दिवस शांत मनाने काढण्याचा प्रयत्न करा.

वृश्र्चिक :–बरेच दिवसापासूनचे घरगुती खरेदीचे बेत ठरतील. कोर्टाच्या रेंगाळलेल्या कामासाठी वकिलांची भेट तातडीने घेतल्यास पुढील गोष्टींची लांबड लागणार नाही. मोठ्या भावंडांबरोबर तात्विक मतभेद आतून सुवर्णमध्य साधण्यासाठी सध्यातरी शांत बसणे महत्वाचे ठरेल.

धनु :–कुटुंबातील आदर्श वाटणार्‍या मान्यवर व्यक्तीच्या सत्काराचे नियोजन कराल. ज्यांची इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे त्यांनी आपल्या क्लायंटसना विश्वासात घेऊन योजना समजावून सांगाव्यात. तरूणां अती उत्साहात कामाला सुरूवात करतील.

मकर :–कामातील केलेल्या सुधारणेमुळे कामाची प्रतही वाढेल. लहानशा उद्धोग असलेल्याना आपले भांडवल वाढवण्याची गरज निर्माण होइल पण लाभही त्य प्रमाणात होणार आहे. लहान मुलांच्या डोक्याला दुखापत होण्याचा धोका आहे तरी सांभाळा.

कुंभ :–कमिशन एजंट्सना अचानक चांगला लाभ होईल. महिलाना माहेरकडील नात्यातील काळजी वाढवणारी गोष्बातमी कळेल. तरूणांनी कोणत्याच बाबतीत आज स्पर्धेचा विचार करू नये. कुटुंबाबरोबर आजचा दिवस आनंदात जाणार आहे.

मीन :–महिलांना आज भरपूर नटण्याची संधी मिळणार आहे. आजारी असलेल्यांना नव्याने उत्साह निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी उत्तम यशासाठी आत्मचिंतन करणे महत्वाचे ठरेल व त्यामुळे आपली बलस्थाने व कमतरता चा अंदाज येईल.

|| शुभं-भवतु ||

 

 

One thought on “दैनिक राशीभविष्य 12 डिसेंबर 2020

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *