Read in
मित्रमैत्रिणींनो नमस्कार,
तुम्हा सर्वाना व तुमच्या कुटुंबियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. नवीन वर्ष आपणास सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आरोग्याचे व आनंदाचे जावो.
शुक्रवार 01 जानेवारी 2021 चे दैनिक राशीभविष्य
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
शुक्रवार 01 जानेवारी आज चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 20:14 पर्यंत व नंतर आश्लेषा.वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमच्या मनात येणार्या शंकाकुशंकाना लांब करायचा संकल्प करा. नातेवाईकांबरोबर आनंदाचे प्रसंग सेलिब्रेट कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात धनवृद्धी झाल्याचा अनुभव येईल. लहान मुलांसाठी अचानक मोठा खर्च करावा लागेल.आईवडीलांची भेट घडेल.
वृषभ :–कुटुंबवत्सल मंडळीनी जरा इतरांनाही वेळ द्यावा. गृहिणींनी आपली आवड व्यक्त करावी. तरूणांचा आजचा दिवस अतिशय मौजमजेत जाणार आहे. नोकरीत जून्या सहकार्यांची भेट होऊन कौटुंबिक प्रश्र्नांवर चर्चा होईल. ज्येष्ठ बंधु बरोबर फोनेटीक बातचीत होईल.
मिथुन. :–शेअर मार्केटमधील कालचा फायदा उल्लेखनीय राहील. ज्येष्ठांना त्यांच्या मागण्या मनमुराद पूर्ण करू द्या तसेच त्यांची गैरसोय होत नसल्याची काळजी घ्यावी लागेल. महिलांनी मनातील विचारांना मोकळी वाट करून द्यावी. महिलांना माहेरील प्रेमाचा लाभ होईल.
कर्क :–बाहेर पडताना पर्समधे जेवढे पैसे घ्याल तेवढे खर्च करून याल. तरी मनाला व खर्चाला कुठेतरी बंधन घालणे आवश्यक राहील तरूण वर्ग अनाठायी पैसे खर्च करतील. बँकेच्या व्यवहाराची चर्चा लहान मुलांसमोर करू नका.वडीलांकरीता मौल्यवान वस्तु घ्याल.
सिंह :–मुळातील वृत्ती खंबीर असूनही आज स्वभावात अतिशय मवाळपणा येणार आहे. आजचे तुमचे वागणे बघून सर्वानाच आश्र्चर्याचा धक्का बसणार आहे. लहान मुलांच्या घोळक्यात रमाल. कुटुंबात नातेवाईकांचे येणे होऊन गप्पा रंगातील.
कन्या :–आच सर्वानाच मैत्रिणींचा सहवास आनंददायक राहील. ज्येष्ठांना जूने तरूणपणीचे मीत्र भेटतील व अचानक गप्पांचा फड जमेल. कोर्टात चाललेल्या प्रकरणावर मित्रांकडून चांगला सल्ला मिळेल. तरी कांहीही बाबी लपवू नका.
तूळ :–नवीन कपडे खरेदीचे स्वप्न अचानक पूर्ण होईल. भावांना बहिणीकडून आवडती, सुंदरी भेटवस्तू मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात काम करणार्यांचा विद्यार्थी वर्गाकडून मानसन्मान होईल. नवविवाहितांना गोड बातमी कळेल. पतीपत्नीमधील दुरावा संपेल.
वृश्र्चिक :–मित्राच्या अडीअडचणीसाठी मोठ्या खर्चाची सोय करावी लागेल. तुमच्या जागेवर केलेले अतीक्रमण उठवण्याकरीता तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येईल. गेल्या वर्षी हरवलेली वस्तू अचानक सापडेल. परगावी असलेल्या आईवडीलाकरीता खरेदी कराल.
धनु :–आईच्या प्रेमाखातर तुम्हाला न आवडणारी गोष्टही आनंदाने कराल त्यामुळे मातोश्री एकदम खुष होतील. देवळाचे पुजारी, ज्योतिषी यांना चांगले उत्पन्न देणारे नवीन काम मिळेल. लहान कपड्याच्या दुकानदारांचा आज डबल फायदा होईल.
मकर :–गेल्या वर्षापासून परिचयात असलेल्या विवाहेच्छूचे प्रेमविवाह ठरतील. खाजगी नोकरीतील अधिकारी वर्ग स्वतःच्या विचारांचे व यशाचे भांडवल करतील पण कामाचे सर्व श्रेय दुसर्याला मिळणार आहे.अचानक मनात आले म्हणून प्रवास कराल.
कुंभ :–महिला वर्ग कर्तृत्ववान महिलेचा आदर्श नजरेसमोर ठेवून कामाची दिशा ठरवतील. बहिणीकडून भावाच्या आजवरच्या कष्टाचे कौतुक होईल. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. महत्वाच्या कामात मित्राची मदत मिळेल.
मीन :–नुकताच केलेला नवीन व्यवहार किंवा अँग्रीमेंट अत्यंत फायदेशीर ठरेल. महिलांना सासरच्या मंडळींकडून गोड गिफ्ट मिळेल. तरूण मुलीकरीता वडीलांकडून नवीन वस्त्र खरेदी होईल. आजचा दिवस आनंदात व मजेत जाईल.
|| शुभं-भवतु ||
विशेष सूचना:- शनिवार दिनांक 2 जानेवारी व रविवार दिनांक 3 जानेवारी या दोन दिवसात फक्त आपल्या नक्षत्रांवरून आपल्याला 2021 या वर्षाचे नियोजन करता येण्यासाठी मी आपणासमोर प्रत्येक महिन्याच्या महत्वाच्या बाबी देणार आहे. त्यासाठी प्रथम आपण आपले नक्षत्र समजून घ्या. ज्यांना माहित नसेल त्यांनी देववाणीच्या पर्सनल नंबरवर मेसेज केल्यास त्यांना मेसेजने कळवले जाईल.