weekly-horoscope-2020

रविवार 04 एप्रिल ते शनिवार 10 एप्रिल 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 04 एप्रिल ते शनिवार 10  एप्रिल 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 04 चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 26:05 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.

weekly-horoscope-2020

सोमवार 05 चंद्र रास धनु 08:01  पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 26:04 पर्यंत व नंतर श्रवण. मंगळवार 06 चंद्ररास मकर दिवसरात्र व चंद्र नक्षत्र श्रवण 26:33 पर्यंत व नंतर धनिष्ठा. बुधवार 07 चंद्ररास मकर 14:59  पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा 27:32 पर्यंत व नंतर शततारका. गुरूवार 08 चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका  28:56  पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा. शुक्रवार  09 चंद्ररास कुंभ 24:16 पर्यंत व नंतर मीन. चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा अहोरात्र. शनिवार 10 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पूर्वाभाद्रपदा 06:45 पर्यंत व नंतर उत्तराभाद्रपदा.

 

05 एप्रिल सोमवार रोजी गुरू कुंभेत प्रवेश करण्याची वेळ  24:25 आहे.

07  बुधवारी पापमोचिनी एकादशी आहे.

09 शुक्रवारी  प्रदोष

10 शनिवारी  शिवरात्री असून , शुक्राचा मेष राशीत 06:08  ला प्रवेश करत आहे.

वरील प्रमाणे प्रत्येक दिवसाच्या राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार
कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–वडीलांच्या मदतीने व सल्ल्याने जे काम कराल त्यात यश येईल. तसेच जी कामे अडली आहेत त्यातही वडीलांचा सल्ला घ्या. आजपर्यंत करत असलेल्या कामाव्यतिरीक्त या सप्ताहात तुम्हाला काय करणे फायदेशीर आहे याची प्रथम यादी करा. प्रथम संततीचे आजार बळावतील तरी त्याच्याप्रकृतीकडे  विशेष लक्ष द्यावे लागेल. आता सुरू होणार्या परिक्षांमधे यश मिळवण्याकरता या राशीच्या मुलांची एकाग्रता पाहिजे तितकी मिळणार नाही तरी आईवडीलांनी  मुलांच्या अभ्यास करवून घ्यावा. दवाखान्यातून डिसचार्ज मिळणार्‍या पेशंट्सना पुन्हा १,२ दिवस दवाखान्यातच रहावे लागेल. गूढविद्ध्या, अध्यात्मिक  वृत्तीच्या अभ्यासकांना आत्मशक्तीचा अनुभव येईल.

 

वृषभ :–या सप्ताहात मनातील इच्छा प्रत्यक्षात पूर्ण होणार आहेत. अध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या अध्यात्मिक गुरूमाउलींकडून महत्वाचा व मोलाचा सल्ला मिळेल.सप्ताहाच्या मध्यानंतर  न्यायालयातील बर्याच दिवसांपासून रेंगाळ लेल्या कामाला गती मिळेल. व्यवसायातील होणारा धनलाभ हा गुंतवलेल्या भांडवलावर अवलंबून नसून आपल्या कामाच्या नियोजनावर व पद्धतीवर असल्याचे जाणवेल व पटेलही. ज्याच्यावर आरोपपत्र दाखल झाले आहे त्यांनी आपल्या केसमधे गुंतागुंत वाढणार नाही याची काळजी घ्यावी. गुप्त गोष्टींबाबत जागरूकता पाळावी. सरकारी क्षेत्रातील नियम काटेकोरपणे पाळावेत.

 

मिथुन :–तूमच्या पूर्वपुण्याईमुळे तुम्ही एका मोठ्या संकटातून वाचाल. लाचलुचपत, भ्रष्टाचार याबाबतीत अतिशय जागरूक रहावे लागेल. अचानक तुमच्या विरोधातील राजकारण तापेल व मानसिक ताण तणाव निर्माण होईल. कोणत्याही प्रतिक्रीया व्यक्त करू नका म्हणजे प्रकरण चिघळणार नाही. व्यवसाय, व्यापारात  वडीलधार्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. पैशाच्या मागे लागून कोणत्याही कामाची घाई करू नका. वडिलांच्य प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायामधे केलेला बदल लाभदायक ठरेल. प्रसूती झालेल्या महिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

 

कर्क :–नोकरीसाठी परगावी असलेल्यांना आपल्या घरी येण्याची संधी मिळणार आहे. संशोधन क्षेत्राशी निगडीत असलेल्यांना नवीन कामाची संधी दिसेल व हातातील कामाचा टप्पा आटोक्यात आल्याचे जाणवेल. आजारी असलेल्यांनी आपल्या पचनसंस्थेवर ताण न दिल्यास लवकरबरे वाटेल. वयस्कर मंडळींना डोळ्याखाली सूज येणे  किंवा पायावर सूज येणे अशा त्रास होईल. ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. तरूण वर्गाच्या मनातील सेवाभावी वृत्ती जागृत होईल. बर्याच दिवसापासून रेंगाळलेल्या कामासाठी ओळख, वशिला  लावण्याचा प्रयत्न करू नकाकारण त्यामुळे कामातील अडचणी वाढतील.

 

सिंह :–सध्या तुमच्या सुरू असलेल्या नोकरीत अडचणी निर्माण होणार्‍या घटना घडतील. कोणत्याही परिस्थितीत स्वत:हून नोकरी सोडू नका, राजिनामा देऊ नका.  निर्माण  झालेला प्रश्र्न समंजसपणाने  हाताळला. व्यावसायिक क्षेत्रात कामगार. वर्गा  बरोबरचा रेपो बिघडू देऊ नका. कर्ज  मिळवण्याबाबतचा प्रश्र्न  सहजासहजी सुटेल. महिलांचे पाय मांड्या दुखण्याचा अतिशय त्रास होईल. वारसाहक्काने मिळणार्‍या गोष्टीबाबत फार लोभ दाखवू नका. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अती घाई केल्यास प्रकरण अंगाशी येईल. राजकीय मंडळीना स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी उड्या माराव्या लागतील.

 

कन्या :–विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासाची, परिक्षेची भिती वाटत होती त्याची भिती कमी होईल. व्यवसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याने तुमचा विशेष सन्मान होईल. वृद्ध आईवडीलांना मुलांचा मोठा आधार वाटेल, मनातील राग लोभ निघून जातील. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही. आँफिसचे  काम घरातून करणार्‍यांना आपल्या कामाचे नियोजन बिघडत चालल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. पतीपत्नीच्या व्यवसायात मोठ्या कर्जाची सोय होणार नसल्याने त्याच्यावर विसंबून राहू नका.

 

तूळ :–जाहिरात व प्रकाशन संस्थेत काम करणार्‍यांना सध्या सुरू असलेल्या कामासाठी वाढीव कालावधी मिळेल. हातातील प्रोजेक्टसाठी  सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी कालावधी वाढवून मिळेल. नोकरीतील  कानावर आलेल्या बातम्या खर्या समजून राहू नका. अफवांची पण शक्यता आहे हे लक्षांत घ्या. प्राणायाम, मेडीटेशन करणार्‍यांना आपला अभ्यास योग्य दिशेने चालला आहे याची पोचपावती मिळेल. घरातील, सोसायटीतील पाण्याच्या जागेची स्वच्छता तपासून पहावी लागेल. बालसंगोपन केंद्रातील जबाबदारी सांभाळताना तुम्हाला टेन्शन येणार आहे.

 

वृश्र्चिक :– मुलीच्या प्रसुतीची काळजी वाढेल. कुटुंबात नव्याने येणार्‍या पाहुण्यांचे स्वागत करण्यात गुंतून जाल. नोकरीतून केलेल्या बचतीच्या पैशातून सोने विकत घेण्याचे विचार कराल. सौंदर्यप्रसाधनाच्या उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. घरगुती पार्लरचा व्यवसाय अचानक चांगला चालू लागेल. फँशन डिझायनिंगच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक होईल व मार्केटमधे  प्रतिष्ठेचा विषय राहील. राजकीयदृष्टय़ा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या प्रयत्नात उलट नाराजी ओढवून घ्याल. प्रेमाच्या व्यवहारात एकदम अचानक नाराजी निर्माण होईल.

 

धनु :–झोपेचा त्रास असणार्‍यांनी त्रासामागच्या कारणांचा विचार करावा व त्यासाठी डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. घरातील पसारा आवरताना आपला पासपोर्ट सापडणार नाही तरी आता शोधून ठेवा. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना  नवीन तु च्या अपेक्षेप्रमाणे नोकरी मिळत असल्याचे जाणवेल. काँलेजमधे शिक्षण घे आर्या विद्यार्थ्याी, च्या अभ्यासाची घडी बिघड ली असल्याचे   जाणवेल.कुटुंबातील लहान सहान घडामोडींची चर्चा करत बसू नका. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे परतफेडीची चिंता निर्माण  होईल. जप्ती वगैरे येणार नाही त्याची भिती मनात धरू नका.

 

मकर :–आजपर्यंत तुम्ही कधीच स्वत:ची हौसमौज केली नाहीय पण या सप्ताहात तुम्हाला तुमच्या छंदाला वेळ देता येणार आहे. तुमच्या स्वत:च्या हौसेसाठी कुटुंबाकडून तुंम्हाला सहकार्य केले जाईल. स्पर्धात्मक परिक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांनी ओव्हरकाँन्फीडन्समधे न जाता स्वत:ला कमी समजून अभ्यासाचा रट्टा मारावा. स्टेशनरीच्या दुकानदारांनी व्यवसायात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल. महिलांनी  घरातील पैसे ठेवण्याच्या जागेत बदल करावा. व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे अंदाज अचूक निघतील व त्यानुसार तुम्ही केलेलाबदल पण लाभदायक ठरेल.

 

कुंभ :–या सप्ताहात तुम्हाला सर्व बाजूनी यश येऊ लागेल. व्यवसाय धंद्यातही चांगला लाभ होईल. अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्‍यांना श्री गुरूमाऊलीकडून आशिर्वाद मिळेल व तुमच्याकडून ही अभ्यास सुरू होईल.पतीपत्नीमधील रुसवेफुगवे कमी होऊन मनोमिलन होईल. न्यायालयात रेंगाळलेल्या कामाला सुरूवात होउ शकते पण त्यासाठी तुम्हाला झाल्या प्रकाराबद्धल तुमच्या वकीलांकडे माफी मागावी लागेल. नव्याने नोकरीच्या शोधात असाल तर सध्या आहे तिथेच रहा.  बदलाची अपेक्षा करू नका. राजकीय मंडळींना प्रतिस्पर्ध्यावर मात करणे सहज शक्य होणार आहे.

 

मीन :–या सप्ताहात होणारा धनलाभ व त्याचा लाभ घेण्याची संधी ही तुमच्या विचारांवर अवलंबून राहील. आरोग्याच्या दृष्टीने तरूणांनी अतिशय जागरूक राहण्याची गरज आहे. ताप व अंगदुखी वाढेल. नोकरीत तुमच्या मनात नसतानाही अचानक तुमच्या प्रमोशनचे वारे वाहू लागतील. काका व आत्या साठी लहानश्या प्रवासासाठी मदत करावी लागेल. वडिल भावंडाकडून कायद्याच्या कामात चांगली मदत मिळेल. अहंपणा दूर केल्यास बर्‍याच गोष्टी हलक्या होतील व व्यवहारातील बिघडलेल्या गोष्टी मार्गी लागतील. शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी आपल्याच देशात शिक्षण घेण्याचे नवीन पर्याय शोधावेत.

||शुभं-भवतु ||

One thought on “रविवार 04 एप्रिल ते शनिवार 10 एप्रिल 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *