Read in
बुधवार 05 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 05 मे चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 09:10 पर्यंत व नंतर शततारका.
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–बर्याच दिवसापासून बंद ठेवलेले वाहन चालवण्याचा विचार कराल. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारांना सपोर्टीव्ह काम कराल व एखाद्या नवीन योजनेत सहभागी करून घेतले जाईल.
वृषभ :–वकील मंडळीना आज आपली बाजू पटवून दिल्याचा आनंद मिळेल. बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला असल्यास तुम्हाला सहजपणे कर्ज मंजूर होण्याचे संकेत मिळतील. लहान भावंडाच्या शिक्षणाबाबतचा निर्णय तज्ञांच्या विचाराने घ्या.
मिथुन :–कोणाच्याही वादात, प्रत्यक्ष भांडणामधे पडू नका. मानसिक त्रासाबरोबर कायदेशीर बाजू तुमच्यावरच उलटेल. महिलांबलोबरचा आजचा दिवस त्रासदायक जाणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरीष्ठांच्या विरोधातील चाललेल्या अफवांवर विश्र्वास ठेवू नका.
कर्क :– जून्या तून बनवलेल्या नवीन वस्तू मुळे तुम्ही एकदम प्रसिद्धीस याल. कालच्या प्रमाणे आजही कामाची घाई गडबड राहील. ज्येष्ठांना दिलेला शब्द तुम्हाला पाळता न आल्याने जेष्ठ मंडळींची नाराजी ओढवून घ्याल.
सिंह :–साध्या गोष्टीवरून मित्रांबरोबर वाद निर्माण होईल. व्यवसायातील गुंतवणुकीतून होणारे लाभ चांगले दिसले तरीही नव्याने पुन: गुंतवणूक करण्याच्या मोहात पडू नका. बँकेतील कर्मचार्यांनी अनवधानानेही कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खात्री करून घ्या.
कन्या :–राजकीय मंडळीना आजचा दिवस तुमच्या विरोधातील कृती वाढवणारा ठरेल. नोकरीतील प्रमोशनच्या बाबतीत तुमचे नांव अग्रेसर राहील. जून्या मुलाखतीतून तुम्हाला शाँर्ट लिस्ट केल्याचे कळेल. लहान मुलांच्या झटापटीत डोक्याला मार लागण्याचा धोका आहे.
तूळ :–शिक्षकांनी दिलेल्या स्वत:च्या परिक्षेत उत्तम प्रकारे पास झाल्याचा निकाल मिळेल. विवाहेच्छूंना मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद मिळेल. कुटुंबातील जवळच्या नात्यातील व्यवहारात पारदर्शकता राहील्याने गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
वृश्र्चिक :– प्रेमळ स्वभावाच्या हळव्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने तुमचे मानसिक बळ वाढेल. तुमचे प्रवासाचे बेत मित्रमंडळींकडून उधळून लावले जातील. नोकरीतील कामाचा आवाका आवरणार नाही. बर्याच दिवसापासून रेंगाळलेले घराचे रजिस्ट्रेशन चे काम या आठवड्यात पूर्ण कराल.
धनु :–जवळच्या नात्यातील व्यक्तीच्या बाबतीत काळजी वाढवणारी बातमी कळेल. नवीन सुरू करणार असलेल्या व्यवसायाबाबत आजी आजोबांकडून मोलाचा सल्ला मिळेल. महिलांना पित्ताचा व उलट्यांचा त्रास संभवतो. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.
मकर :–तुमच्या कष्टाळू स्वभावामुळे आज तुमच्या अंगावर इतरांची कामे पण येणार आहेत. व्यवसायातील बँकेच्या कर्जाबाबत परतफेडीसाठीचे निरोप भंडावून सोडतील. प्रेमाच्या व्यवहारात मवाळपणाने वागल्यास एकमेकाबद्धल राग निर्माण होणार नाही.
कुंभ :–डाँक्टर मंडळींचे प्रतिनिधीत्व करणार्या वेबिनार मधील सहभाग महत्वाचा राहील. राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या स्वभावातील सडेतोडपणा नुकसान करणारा ठरेल. नेहमीच तुम्ही बाजी माराल याची खात्री नसते हे लक्षात घ्या. कोणत्याही परिस्थितीत विवाहाचा निर्णय घाईने घेऊ नका.
मीन :–बर्याच दिवसापासून तुमचे लेखन बंद असल्याने मित्रमंडळी व वाचक वर्गाकडून विचारणा होईल. सरकारी कामातून दिल्या जाणार्या योजनांवर होणार्या चर्चेतील तुमचा सहभाग खूप मोठे क्रेडीट घेईल. वेळेचे बंधन पाळल्यास पुढील नुकसान टळेल.
||शुभं–भवतु ||