११ मे २०२६, मंगळ प्रवेशामुळे होणाऱ्या घडामोडी

नमस्कार. देववाणी ज्योतिषालयामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत.

या मे महिन्याच्या ११ तारखेला मंगळ हा ग्रह मेष राशीमध्ये प्रवेश करत आहे. फलज्योतिषामध्ये मंगळाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या ग्रहाला ‘युद्धाची देवता’ असे म्हटलेले आहे. कारण मंगळाचे तत्त्वच मुळी महापराक्रमी, साहसी, चैतन्यशील आहे. त्याचबरोबर मनुष्याच्या अंगी असलेली जी काही ऊर्जा आहे, ती ऊर्जा म्हणजेच मंगळाची ताकद आहे.

समाजहिताच्या आणि विकासाच्या दृष्टीने मनुष्याच्या अंगी असलेले धाडस आणि न्यायप्रियता हे अतिशय महत्त्वाचे गुण आहेत. हे गुण फक्त आणि फक्त मंगळदेवामुळेच प्राप्त होतात. त्याचबरोबर धैर्यशक्ती, सहनशक्ती, शूरपणा, दुसऱ्यांचे दुःख निवारण करण्याची प्रवृत्ती आणि स्वार्थत्याग हा देखील त्याच्यामधील महत्त्वाचा गुण आहे.

सामाजिक पातळीवर जिथे गरज आहे, तिथे पुढाकार घेणे, नेतृत्व करणे, न्यायासाठी झटणे, दुसऱ्यांना मदत करणे आणि पूर्ण ताकदीने दुसऱ्यांसाठी लढणे हे मुख्य गुण या मंगळदेवाचे आहेत.

त्याचबरोबर अतिशय जलद आणि तीव्र परिणाम घडवून आणणाऱ्या गोष्टी, म्हणजे रसायनशास्त्रातील कामे, रक्तामधील दोष पुढे आणणे, ऑपरेशन, अपघात आणि जगातील युद्धे सुद्धा या मंगळावर अवलंबून आहेत. वास्तविक निसर्गतः हा पापग्रह असला, तरीसुद्धा सर्व प्राणीमात्रांचा हा एक संरक्षणमंत्री म्हणायला हरकत नाही.

आता आपण हाच मंगळदेव मेष राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे काय काय घडवून आणणार आहे, याचा विचार करूया.

सध्या मेष राशीला शनीची साडेसाती आहे. मंगळदेव हाच मुळात अग्नितत्त्वाचा आहे आणि मेष रास ही देखील अग्नितत्त्वाची आहे. त्यामुळे स्वतःच्या राशीत आलेला हा मंगळदेव म्हणजे पूर्ण ताकदीने, साहसाने, आत्मविश्वासाने आणि धाडसाने सर्व गोष्टी घडवून आणणारा ठरेल.

२३ फेब्रुवारी ते २ एप्रिलपर्यंत राहू-मंगळाचा कुंभ राशीतील कालावधी हा अंगारक योग होता. त्यानंतर २ एप्रिल ते ११ मेपर्यंत मीन राशीमध्ये शनी आणि मंगळ हे द्वादशभावामध्ये, म्हणजेच व्ययस्थानामध्ये एकमेकांच्या बंधन योगात होते. याच बंधनातून मंगळ शनी महाराजांच्या तावडीतून सुटून मेष राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. पण शनी महाराज मात्र ३ जून २०२७ पर्यंत मीन राशीतच राहणार आहेत.

स्वराशीत मेष राशीमध्ये असलेला आणि मेष व वृश्चिक राशीचा स्वामी असलेला हा मंगळदेव मेषेमध्ये आल्यामुळे कालपुरुषाच्या लग्नस्थानी आहे. त्यामुळे त्याची चौथी दृष्टी सुखस्थानावर, सातवी दृष्टी सप्तमस्थानावर आणि आठवी दृष्टी अष्टमस्थानावर पडत आहे.

चौथ्या आणि आठव्या स्थानावर असलेली दृष्टी ही विशेष दृष्टी मानली जाते. मंगळ हा दशम स्थान व दक्षिण दिशेलाही बलवान असतो. दशम स्थान हे कर्मस्थान असल्याने व्यक्तीला धडाक्याने कर्म करायला भाग पाडते. त्याच प्रमाणे तो जन्मकुंडलीत ३/१०/११ व्या स्थानात बलवान असतो. मंगळाची स्वतःची पूर्ण शक्तीनिशी ताकद दाखवणारी राशी मेष आणि वृश्चिक आहे. तर मकर ही उच्च रास असून कर्क ही नीच रास आहे.

चतुर्थस्थान म्हणजे कर्क रास, सप्तमस्थान म्हणजे तुळ रास आणि अष्टमस्थान म्हणजे वृश्चिक रास. म्हणून कर्क, तुळ आणि वृश्चिक या तीन राशींना मंगळ आपले गुणधर्म पुरेपूर देणार आहे.

आता मंगळदेवामुळे आपल्याला कोणकोणते गुणधर्म मिळणार आहेत आणि त्याचा आपण कसा उपयोग करावयाचा आहे, याचा विचार करूया.

मंगळाची प्रभावी क्षेत्रे पोलिस, लष्कर असून लढणाऱ्या सैनिकांवर त्यांचे वर्चस्व असते. मंगळ रक्ताचा कारक असल्याने पशू हत्या करणारा खाटीक आणि शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर हेही मंगळाच्या प्रभावाखाली येतात. संपूर्ण ४० दिवसांमध्ये मंगळदेव आपले ३० दिवसांची चाल चालून जाणार असल्यामुळे त्यांच्या बाल, युवा, वृद्ध व मृत या चारही अवस्था आपल्याला अनुभवता येणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला या ४० दिवसांमध्ये अतिशय काटेकोरपणे वागून मंगळदेवाकडून अशक्य त्या गोष्टी घडवता येणार आहेत.

लग्नी, म्हणजेच कालपुरुषाच्या मेष राशीमध्ये आलेला हा मंगळदेव तुमच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ करणार आहे. त्याचबरोबर तुमची अंतरिक ऊर्जा वाढेल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. तुमच्यामधील नेतृत्वशक्ती, धडाडी आणि शौर्य यामध्ये वाढ होणार असून तुमच्या प्रयत्नांना यशही येणार आहे.

तुमची इतरांवर पडणारी छाप आणि जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोनही बदलेल. वैचारिक पातळीवर फक्त आणि फक्त धडाडीच तुमच्या नजरेसमोर राहील.

मंगळदेवाची चौथी दृष्टी ही चतुर्थस्थानावर आहे. त्यामुळे वाहन घेणे, जमीन घेणे, आईच्या संदर्भातील सुखप्राप्ती अशा गोष्टी घडतील. प्रॉपर्टी रिलेटेड आणि स्थावर मालमत्तेसंदर्भात लाभ मिळेल. खरेदी होईल. कोर्टकचेरीची कामे असतील, तर त्यामध्येही तुमचे प्रयत्न यशस्वी होणार आहेत.

आई आणि कुटुंबीय सदस्य यांच्यासाठी तुमच्याकडून खर्चही तितकाच होणार आहे. तरी प्रत्येकाचा स्वभाव आणि आवडीनिवडीचा विचार करून तो खर्च कारणी लावलात तर तुम्हालाही आनंद मिळवता येणार आहे.

या मंगळदेवाची सातवी दृष्टी सप्तमस्थानावर पडल्यामुळे सप्तमस्थानातील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. सप्तमस्थान हे वैवाहिक जीवनाचे आणि व्यवसायाचे स्थान असल्यामुळे, प्रथमतः विवाहाच्या बाबतीत तुम्हाला घाई करता येणार नाही.

विवाहेच्छुक वधू-वरांना विवाहासाठी लागणारा वेळ, ऍडजस्टमेंट आणि परस्पर समजूत या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावा लागेल. त्याचबरोबर विवाहाचे कायदेशीर स्थान असल्यामुळे रजिस्टर विवाह करावयाचा असल्यास काही अडचणी निर्माण होऊ शकतात.

राहूची सातवी दृष्टी पंचमस्थानावर असल्यामुळे प्रेमविवाह किंवा रजिस्टर विवाह घाईने केल्यास तो यशस्वी होईल का, याचाही विचार करावा लागणार आहे.

त्याचबरोबर नोकरीतील बॉस, अधिकारी किंवा वरिष्ठ व्यक्तींकडून कोणता त्रास होऊ शकतो, याचा आधीच विचार करून ठेवलेला बरा. म्हणजे आपल्या हातून होणारी चूक आपल्याला महागात पडणार नाही.

दुकानदार, मालक किंवा व्यावसायिकांनी आपल्या हाताखालील सेवकांशी अतिशय प्रेमाने वागावे लागेल. कारण हे स्थान व्यवसायाचे असल्यामुळे मंगळ महाराज व्यवसायामध्ये घडामोडी करतील आणि त्या घडामोडी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

आर्थिक उलाढाली शांतपणे आणि विचारपूर्वक कराव्यात. ओव्हरड्राफ्ट घेणे, कर्ज काढणे, भागीदारी वाढवणे किंवा दुसऱ्याच्या व्यापारामध्ये भागीदार असाल, तर त्या भागीदारीबाबत विचार करणे आवश्यक राहणार आहे.

पती-पत्नीमधील प्रेमाला काही प्रमाणात ओहोटी लागण्याची शक्यता आहे. मतभेद, वादविवाद किंवा जुने वाद उकरून काढून भांडणे करण्याचा प्रयत्न करू नये.

घर भाड्याने दिलेले असेल, तर त्याबाबतीतही जागरूक राहणे महत्त्वाचे ठरेल. स्थावर मालमत्ता, जमीन-जुमला, वडिलोपार्जित मालमत्ता आणि सुखसोयीची साधने, उपकरणे किंवा घरातील वस्तूंमध्ये काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे दुरुस्तीच्या खर्चासाठी मानसिक तयारी ठेवावी.

बागायती शेती आणि शेती उत्पादनांबाबत काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आता आपण अष्टमस्थानावर मंगळदेवाची दृष्टी पडल्यानंतर निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करूया.

मंगळदेवाची आठवी दृष्टी अष्टमभावावर पडत आहे. अष्टमस्थानाला मृत्यूस्थान, नुकसानकारक स्थान किंवा दुःखद घटनांचे स्थान असे म्हटले जाते. पण त्याचबरोबर या स्थानामुळे ‘इझी मनी’ देखील तयार होतो.

हा इझी मनी कशामुळे तयार होतो, याचा विचार करूया.

कमिशन, दलाली, सासुरवाडीकडून मिळणारे पैसे, कमी कामातून मिळणारे जास्त पैसे, वारसाहक्काने मिळणारे धन, अचानक द्रव्यप्राप्ती, पूर्वजांचे धन, कर्ज देणे-घेणे, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी, बोनस, मृत्युपत्राद्वारे मिळणारे लाभ, दत्तक गेल्याने मिळणारे लाभ, दान, शिष्यवृत्ती किंवा विम्याची रक्कम अशा प्रकारे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

आता आपण मंगळाच्या अष्टमस्थानातील आजारपण आणि मृत्यूस्थान या दृष्टिकोनातून विचार करूया.

मंगळाची सकारात्मकता मिळवण्यासाठी प्रथम क्रोध दूर करणे महत्त्वाचे ठरेल. रागामुळे आजकाल अनेक रोग निर्माण होतात. ब्लडप्रेशर वाढणे, चक्कर येणे, एखादी गोष्ट मनासारखी न झाल्यामुळे डिप्रेशन येणे, अपयशामुळे मानसिक त्रास होणे अशा गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

म्हणूनच अष्टमस्थानातील दोष आणि वाईट गोष्टी टाळण्यासाठी आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अशा प्रकारे आपण जागरूक राहून या ४० दिवसांतील मंगळाच्या भ्रमणाचा लाभ घ्यायचा ठरवला, तर खचितच आपल्याला लाभ मिळेल. आपल्या कार्यामध्ये आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल आणि कार्य यशस्वी करण्यासाठी मंगळदेव नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतील.

आता त्यासाठी कोणती उपासना करावी, मानसिक बळ वाढण्यासाठी आणि मंगळदेव प्रसन्न होण्यासाठी कोणती साधना करावी, याचा विचार करूया.

मंगळदेवाचे अधिदेवता भगवान श्रीगणेश आहेत. म्हणूनच श्रीगणेशाचे स्तवन करणे, गणपती अथर्वशीर्षाचे वाचन करणे आणि श्रीगणपतीची उपासना करणे अत्यंत लाभदायक ठरेल.

सहज नामस्मरणासाठी पुढील मंत्राचा जप करावा —

“ॐ गं गणपतये नमः।”

या मंत्राचा दिवसातून किमान १०८ वेळा एका जागी बसून जप करावा आणि मंगळदेवाला नमस्कार करावा.

जय मंगळदेव!
जय गणपती बाप्पा!

 

daily horoscope

गुरूवार 24 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 24 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 24 जून चंद्ररास वृश्र्चिक 09:10 पर्यंत व नंतर धनु.

 

चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 09:10 पर्यंत व नंतर मूळ. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :– नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचे विचार मनात येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर
सुटणार असल्याचे लक्षात येईल तरी त्यानुसार प्रयत्न करावेत. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कितीही कष्ट
करण्याची मनाची तयारी होईल.

वृषभ :–ओळखीच्या व ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने केलेला व्यवसायातील बदल लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात
अचानक नवीन घर घेण्याचे विचार सुरू होतील. घरगुती उद्योगातून होत असलेली आर्थिक प्रगती कौतुकास्पद
राहील.

मिथुन :– आई व मुलगी यांना एकमेकांपासून लांब राहणे अवघड असल्याचे जाणवेल. परदेशातील मुलांना घराची
ओढ अतोनात जाणवेल. कलाक्षेत्रातील कलाकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कला सादर करण्याचे
नियोजन कराल.

कर्क :–सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण न करता झपाट्याने काम सुरू कराल. आजपर्यंत तुमच्या मनातील इच्छा
प्रत्यक्षात पूर्ण होण्याकरीता घेतलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसेल.

सिंह:–नोकरीच्या ठिकाणच्या प्रत्येक अडचणी, समस्या तुम्हीच सोडवल्या पाहिजेत ह्या भ्रमातून बाहेर या.
महत्वाची खरेदी करताना अती चोखंदळपणा करू नका. नात्यातील विवाह ठरवण्यासाठीच्या व्यवहाराकरीता तुमची
मदत घेतली जाणार आहे.

कन्या :–आज तुमच्या बोलण्या वागण्यातील चातुर्य तुमच्या कामी येईल. परदेशाशी संबंधित व्यवहारात आलेल्या
अडचणी चुटकीसरशी सोडवाल. लहान मुलांच्या डोक्याला मार लागण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी लागेल.

तूळ :–कुटुंबात जोडीदाराचा लहरीपणा वाढेल त्यामुळे कोणत्याच विषयाच्या निर्णयावर येऊ नका. अचानक सोने
खरेदीचे बेत ठरतील व तुमचे काहीही चालणार नाही. बालवयातील मुलांचा हट्ट डोके भंडावून सोडेल.

वृश्र्चिक :–नुसती चिंता करण्यामुळे काहीच साध्य होत नाही हे लक्षात असू द्या. नोकरीतील वरीष्ठांबरोबर
बोलताना अहंकाराला दूर ठेवल्यास त्यांचे तुमच्याबद्धलचे मत खराब होणार नाही. आजचा दिवस संमीश्र
अनुभवाचा राहील.

धनु :–विद्यार्थ्यांना शाळा व शिकवणी क्लासचे वेध लागतील. लहान शाळकरी मुलांनी सायकल चालवताना
संभाळून चालवावी. नात्यातील काही व्यक्तींच्या त्रासाने मनस्थिती हळवी होईल व मोकळेपणाने रडावेसे वाटेल.

मकर :– मनाला न पटलेल्या गोष्टीही सकारात्मक विचाराने करायला लागाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास
तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या वैयक्तिक बाबींवर चर्चा करू नका.

कुंभ :– आज सकाळपासून येणार्‍या सर्व बातम्या यशाच्या येतील. नोकरदारांची नवीन प्रोजेक्ट्स वरीष्ठ
पातळीवरून मंजूर होतील व तुमचे क्रेडीट वाढेल. वयस्कर मंडळींच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल.

मीन :–कुटुंबातील महत्वाच्या जबाबदार्‍या सहविचाराने सोडवण्याचा प्रयत्न केल्यास अडचणी वाढणार नाहीत.
लहान वयाच्या मुलावरील संस्कार शाळेची जबाबदारी कुशलतेने सांभाळाल. विचार न करता केलेल्या खरेदीने
आर्थिक बोजा उचलावा लागेल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 23 जून चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 11:47.पर्यंत व नंतर ज्येष्ठा.

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– नोकरीतील तुम्हाला न पटणार्‍यां गोष्टीं कराव्या लागल्यामुळे मनात बंडखोरीची भावना निर्माण होईल.
ज्येष्ठांकडून कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडत्या गोष्टींची पूर्तता लवकरच करणार असल्याचे आश्र्वासन मिळेल.

वृषभ :–स्पर्धात्मक कार्यक्षेत्रात काम करणार्यांना त्यांचे मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. लेखक, कवी
यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. महिलांनी कुठल्याही परिस्थितीत भावनांचा अतिरेक होऊ देऊ नये.

मिथुन :–जमीनीच्या व्यवहारातील मिळणारी दलाली सहजपणाने मिळणार नाही तरी प्रथम कबूल करून घ्या.
नोकरीत वास्तवापेक्षा भविष्यातील लाभाचे अमिष दाखवले जाईल. तरूणांना त्यांच्या मनाविरुद्ध असलेले मत
स्विकारावे लागेल.

कर्क :–प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष फारच महागात पडणार आहे. दवाखान्यात अँडमिट केलेल्यांच्या प्रकृतीत आराम पडू
लागेल. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना अचानक
कामाच्या दिरंगाईबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल.

सिंह :–सामाजिक कार्यात तुम्ही केलेल्या कामामुळे मानसन्मानाचे मानकरी व्हाल. आईच्या माहेरकडील मंडळींची
भेट घडणार आहे. तरूणांना आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.

कन्या :–अधिक आर्थिक प्राप्तीसाठी दुसर्यांच्या सांगण्यावरून अचानक व्यवसायात बदल करू नका. उधार उसनवार
दिलेले पैसे परत मिळण्याचे निरोप येथील. अहंपणाने ताणून धरल्याने नातेसंबंधात बिघाड निर्माण होईल.

तूळ :–मोठ्या मार्केटमधे काम करणार्यांना नवनवीन उद्योगांची माहिती मिळेल. बोलण्यात स्पष्टता न ठेवल्याने
गैरसमज होणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.

वृश्र्चिक :–मनातील इच्छा प्रबळ झाल्याने काम पूर्ण करण्याची जिद्ध निर्माण होईल. विद्यार्थी एका विशिष्ट
विषयाच्या अभ्यासाच्या प्रवेशासाठी हट्ट धरतील. मुलींच्याकडे प्रत्येक प्रश्राला प्रतिप्रश्न असल्याने कोणताच प्रश्र्न
सुटणार नाही.

धनु :– आज शारिरीक दुर्बल असलेल्यांना मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ वाढेल. इतरांच्या चुका
काढण्यापेक्षा स्वत:च्या कामातील प्रगतीकडे जास्त लक्ष द्या. कलाकार मंडळीना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.

मकर :–जवळच्या नातेवाईकांबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील पण नातेसंबंध बिघडू देऊ नका. वेळेचा सदुपयोग
केल्याने नियोजनात नसलेल्या कामाची पण चांगली सुरूवात होईल. सर्वच गोष्टी तुम्हाला पटत नसल्या तरी सतत
विरोध करू नका.

कुंभ :–तुमच्या पुढाकाराने व कुटुंबियांच्या वतीने शेजारील मंडळीना जिवदान मिळेल. नोकरदारांना वैयक्तिक
डाँक्युमेंटची गरज भासेल पण वेळेवर सापडणार नाहीत. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष न दिल्याने त्याचेकडून
निरूपयोगी खरेदी होईल.

मीन :–तुमचे अंदाज आज अजिबात चुकणार नाहीत. व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे
मार्केटमधील तुमची प्रतिष्ठा वाढेल. परदेशी वस्तूच्या हव्यासापोटी डबल पैसे घालवाल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

मंगळवार 22 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 22 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 22 जून चंद्ररास तूळ 08:59 पर्यंत व नंतर वृश्चिक.

चंद्र नक्षत्र विशाखा 14:22 पर्यंत व नंतर अनुराधा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.

गुरूवार 24 जून रोजी वटपौर्णिमा असल्याने आज मंगळवारपासून त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आरंभ होत आहे.

मेष :– वैवाहिक जीवनातील घडामोडींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास सासूरवाडीकडून दणका बसण्याचा
धोका आहे. सासूरवाडीकडून सशर्त अटींवर व्यवसायात आवश्यक तेवढी आर्थिक मदत मिळेल. सरकारी नियमांचा
ससेमिरा मागे लागेल.

वृषभ :–नोकरीतील तुमच्याकडून झालेली दिरंगाई , तसेच व्यवसायातील न भरलेल्या टँक्स बद्धल विचारणा
करणारी नोटीस येईल. कोणताही वशिला लावायचा प्रयत्न केल्यास अडचणी वाढतील.

मिथुन :–नोकरीतील अडचणीत वाढ झाल्याने नोकरीविषयी आत्मियता राहणार नाही. आजोळकडील ओळखींच्या
माध्यमातून अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तुमची बाजू
मांडण्यास आता संधी मिळणार नाही तरी आता फँक्ट अँक्सेप्ट करावी हे उत्तम.

कर्क :–आज व उद्या आईवडीलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. जमिन व घर याबाबतच्या कोर्टात
चाललेला वाद विवाद कोर्टाच्या बाहेर समंजसपणे मिटण्याचे मार्ग सापडतील. नवीन घराचे पझेशन मिळण्याचे
ठरेल.

सिंह :– आर्थिक कोंडी दूर झाली असूनही नियोजनातील चुकांमुळे आज आर्थिक चणचण जाणवेल. व्यावसायिकांना
गुंतवणूकीच्या जून्या व्यवहारांवर चांगला लाभ होईल. तरूणांनी जुगार सदृश्य व्यवहार टाळावे.

कन्या :–नोकरीत तुमच्यावर आलेले बदलीचे सावट तुम्हाला लाभदायक ठरेल. जोडीदाराच्या नावाने नव्याने केलेली
गुंतवणूक लाभदायक राहील. दवाखान्यातून डिसचार्ज मिळण्यात आज कोणतीही अडचण राहणार नाही.

तूळ :–मित्राच्या मदतीने व्यवसायातील नवीन योजना सुरू कराल. आजपर्यंतची नोकरीतील तुमचा
कामाबाबतचा असलेला आदर व सन्मान वाढेल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वृद्धी होणारे प्रसंग येतील व
प्रतिष्ठेची वाढ होईल.

वृश्र्चिक :–स्मृतीभंशाचा त्रास असलेल्यांना घराबाहेर सोडू नका. विवाहित महिलांनी कुटुंबाकरता घेतलेल्या कष्टाची
जाणीव इतरांना झाल्याचे पाहून महिलांना कृतकृत्य झाल्याचे जाणवेल. शिक्षक व प्रोफेसर मंडळींकडून मोठ्या
प्रोजेक्टची आखणी होईल.

धनु :–पतीपत्नी दोघांच्या सहविचाराने नवीन घराचे बुकींग कराल. विवाहेच्छूना विचार जूळणारा जोडीदार
मिळाल्याने आनंद होईल. मोठ्या प्रमाणातील होर्डींगच्या कामातील व्यवहारावर संदर्भिय खात्याकडून आँब्जेक्शन
घेतले जाईल.

मकर :–लहान मुलांच्या अपचनाच्या तसेच उलटी जुलाबाच्या तक्रारी निघतील. पूर्वी उधार दिलेल्या रकमेच्या
विश्र्वासावर बसू नका. महिलांना स्वकष्टार्जित धनाचा अडचणीं करीता वापर करण्याची इच्छा होईल.

कुंभ :– इतरांच्या सांगण्यावरून घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल. कालपर्यंत ज्यांच्याबरोबर
तुमचे चांगले पटत होते त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
मनातील विचार ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करावी.

मीन :–प्रवासातील जून्या ओळखीची सरकारी कार्यालयात भेट होईल. वैवाहिक जीवनात गोड बातमी मिळेल.
विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दूर गावी किंवा परदेशी जाण्याची संधी मिळेल. या सप्ताहात फारशी आर्थिक चिंता
राहणार नाही.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

सोमवार 21 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार 21 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 21 जून चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 16:45 पर्यंत व नंतर विशाखा.

वरील राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज रवी आर्द्रा नक्षत्रात 29:37 ला प्रवेश करत आहे.
ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी या नावाने ओळखली जाते.
मेष :– मोठ्या लोकांच्या ओळखीने करावयाची कामे आज आठवड्याच्या सुरवातीलाच नियोजनात घेतल्यास या
सप्ताहात कामे बर्‍यापैकी होतील. वैयक्तिक जीवनात मान सन्मान मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील तुमचे अंदाज
अचूक निघतील.

वृषभ :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे, नियोजनाचे खूपच कौतुक होणार आहे. तरूण मंडळीना आपल्या
छंदाचा, कलेचा वापर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून करता येणार आहे. तरी मोठ्यांचा सल्ला घ्यावा.

मिथुन :–स्वत:चा कोणत्याही प्रकारचा उद्योग असला तरी त्यात तुम्हाला चांगले यश मिळून आर्थिक प्राप्ती पण
चांगली होणार आहे. तरूणांच्या जीवनात आजपासूनचे पुढील दोन दिवस चांगल्या घडामोडींचे राहणार आहेत.

कर्क :–नोकरीतील अपेक्षित बदलाचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. आईच्या इच्छेनुसार गावाकडील
घराबाबतचे निर्णय घेतला जाईल व बांधकामाची चर्चा सुरू होईल. दैनंदिन जीवनात आज समाधान मिळेल.

सिंह :–जवळच्याच नातेवाईकांबरोबर वैचारिक मतभेदांमुळे मानसिक नाराजी येईल. मुलांच्या वागणूकीवरून
कुटुंबात वादळ निर्माण होईल. नोकरी विषयक जून्या मुलाखतीच्या वेळी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे जाणवेल.

कन्या :–गेले वर्षभर ज्या आर्थिक अडचणीतून जात आहात त्यात बदल होणार असल्याचे संकेत मिळतील. पूर्वी
झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मित्रांच्या मदतीने तयार नवा उद्योद मिळेल. अजिबात पाय मागे घेऊ नका.

तूळ :–कुटुंबातील आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ लागतील. कलाकारांना अचानक कार्यक्रम मिळाल्याने आर्थिक
बाजू सावरू लागणार असल्याने कुटुंबात आनंद निर्माण होईल. मुलांकडून आवश्यक ती मदत मिळेल.

वृश्र्चिक :–कामगार वर्गाला आरोग्याचे प्रश्र्न मानसिक त्रास देणारे ठरतील. वयस्कर मंडळींसाठी त्यांच्या
आरोग्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. घरातील मानापमानाच्या प्रश्र्नांवर पडदा न टाकल्यास मानसिक स्वास्थ्य
हरवेल.

धनु :–नव्याने नोकरीच्या शोधतील कामगारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील तुमचे
सहकारी अचानक तुमच्या बाबतीत घुमजाव करतील. तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे बळ राहील हे लक्षांत ठेवा.

मकर :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागेल. महिलांनी आपले
व्यक्तिमत्वात बदल करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणूकीबाबतचे तुमचे अंदाज अचूक निघतील.
कामातील घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल

कुंभ :–कुटुंबात ज्येष्ठ मंडळीकडून अचानक अशांतता निर्माण होईल. कलाकारांना आपले स्वप्न साकार होणार
असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून व्यवसायाबाबतच्या महत्वाच्या टीप्स मिळतील.

मीन :–सप्ताहाची सुरूवात आनंदी घटनेने व मनपसंत खरेदीने होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर
आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बँकेच्या व्यवहाराबाबतची चर्चा परक्या समोर करू नये. कुटुंबात नवीन पाहुणा
येणार असल्याची गोड बातमी मिळेल.

||शुभंभवतु ||

 

weekly-horoscope-2020

रविवार 20 जून 2021 ते शनिवार 26 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 20 जून 2021 ते शनिवार 26 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 20 जून चंद्ररास कन्या 07:41 पर्यंत व नंतर तूळ.

Read More

daily horoscope

शनिवार 19 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 19 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 19 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र हस्त 20:27 पर्यंत व नंतर चित्रा.

वरील राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–देवस्थानच्या कारभाराची, हिशोबाची किंवा इतरजी जबाबदारी असेल ती तुमच्याकडून प्रामाणिकपणे पार
पाडली जाईल. उत्कृष्ट काम करण्याच्या सवयीमुळे तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. वडीलांच्या मार्गदर्शनामुळे
कामातील नवनवीन युक्त्या सापडतील.

वृषभ :–विवाहेच्छूंना परिचयातून विवाह जमण्याचे संकेत मिळतील. कोणत्याही रखडलेल्या कामात तुम्ही लक्ष
घातलेत तर काम लवकरच फत्ते होऊन जाईल. कलाकार व गायक मंडळीना आपल्या कलेमुळे प्रसिद्धी मिळत
असल्याचे जाणवेल.

मिथुन :–कोणत्याही व्यवहारात दक्षता बाळगल्यास गडबड घोटाळ्याचा धोका राहणार नाही. शिक्षण क्षेत्रात काम
करणार्यांना नवीन संधी निर्माण होणार आहे तरी त्याचा फायदा घ्या. विचार न करता खर्च करण्याच्या सवयीमुळे
खूप मोठी आर्थिक तंगी निर्माण होईल.

कर्क :–नोकरीतील वाद, मतभेद हे तेथेच मिटवायचे असतात याचा मोठा अनुभव येईल. विवाहेच्छू मुलींनी आपल्या
अपेक्षांना आवर घातल्यास विवाहाचा मार्ग मोकळा होईल. बँकेतील व्यवहार आंधळेपणाने दुसर्यांवर सोपवू नका.

सिंह :–भागीदारीच्या व्यवसायातील नवीन योजना सुरू करण्यापूर्वी पुन: एकदा तपासून पहाव्यात. अडकलेली
सरकारी कामे स्वत: केल्यास ती लवकर होतील व व्यवस्थित व अचूक होतील. कुटुंबात एकत्र बसून सहविचाराने
निर्णय घ्या.

कन्या :–पतीपत्नीच्या एकत्रित उत्पन्नाचा दाखला दिला तर बँकेकडून कर्ज मिळणे सोपे होईल. सरकारी क्षेत्रातील
ज्येष्ठ निवृत्त अधिकार्यांचा तुमच्यावर मोठा प्रभाव पडेल व भारावून जाल. बदलत्या परिस्थितीचा विचार करून
निर्णय घ्या.

तूळ :–खर्चाचे नियोजन न केल्याने अचानक खर्च मर्यादेबाहेर होईल. आईवडीलांनी मुलांच्या आर्थिक व्यवहारावर
लक्ष ठेवल्यास वस्तुस्थितीची कल्पना येईल. उगाच अंदाज बांधत बसू नका.

वृश्र्चिक :– दुर्घटना टाळण्यासाठी आज घराबाहेर पडू नका. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आजच आळस
झटका. व्यवसायातील नवे पर्याय आर्थिक लाभ मिळवून देतील. कुटुंबात धार्मिक पूजेचे नियोजन कराल.

धनु :–दूर गेलेले नातेसंबंध सुधारण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न महत्वाचे ठरतील. कलागुणांना वाव मिळण्यासाठी
तुम्हाला स्वत:हून प्रयत्न करावे लागतील. वैयक्तिक पातळीवर कुटुंबात कौतुक होईल.

मकर :–तुमच्या अतीकाटकसरी स्वभावामुळे कुटुंबात वाद निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीवर
विश्र्वास ठेवून विषयांची निवड करावी. आज मित्रमंडळींच्या नादाने व्यसनाच्या आधीन जाल.

कुंभ :–वडील भावंडांबरोबरचे वाद व मतभेद समंजसपणाने संपवण्याचे मार्ग तुम्हाला अचानकपणे सापडतील.
महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल. हातातील पैशांचा वापर काटकसरीने
केल्याचा आनंद मिळेल.

मीन :–प्रवासात सावधानता बाळगावी. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे आईवडीलांच्या लक्षात
येईल. कलाकार मंडळीना एखादी मैफील गाजवता येणार आहे. मुलांच्या तल्लख बुद्धीला चँलेंज करू नका.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

शुकवार 18 .जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुकवार 18 .जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 18 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:36 पर्यंत व नंतर हस्त.

वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–मुलांच्या संदर्भातील आनंददायक बातमीने खुष व्हाल. आईच्या आशिर्वादाने जमिनीचे व शेतीबाबतचे
अडकलेली कामे मार्गी लागतील. आज कोणालाही जामीन राहण्याचा विचारही करू नका.

वृषभ :–आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीना अभ्यासाच्या सरावाची आवश्यकता आहे. पूर्वीची येणी मिळण्यासाठी चे
तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महिलांना अचानक पाठदुखीचा व कंबरदुखीचा त्रास जाणवेल. कोणतीही नवीन खरेदी
करू नका.

मिथुन :–आजचा दिवस तुमच्यासाठी आईच्या आशिर्वादाचा राहील. कोणत्याही अडकलेल्या प्रकरणातून बाहेर
पडण्यासाठी मनाची शक्ती वापरावी लागेल. बँकेचे व्यवहार स्वत: करा इतरांकडून नकोत.

कर्क :– ज्यांच्या पायांना चिखल्या होण्याची सवय आहे त्यांनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी. नोकरीत
तुम्हाला प्रमोशनची बातमी मिळेल. मित्रपरिवाराबरोबर आवडत्या विषयावर चर्चा होऊन आंतिरक उर्जा वाढेल.

सिंह :–घरगुती व्यवसायात नवीन पर्याय समोर येतील. आत्मविश्वास वाढून पर्यायांचा विचार कराल. नोकरदारांनी
नोकरीतील कामातील बदलाचा स्विकार केल्यास करिअर उत्तम होण्यास मदत होईल.

कन्या :–नोकरीतील वातावरण आव्हानात्मक वाटेल पण तुम्ही स्वत:ला कामात झोकून द्याल. कुटुंबातील
ज्येष्ठांकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. कुळाचाराच्या, धार्मिक पूजेसाठी दोन दिवस घरात विधी चालेल.

तूळ :–वासाची अत्तरे, परफ्युम्स, उदबत्त्या यांच्या घरगुती व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात
उल्लेखनीय केलेल्या कामासाठी समाजिक क्षेत्रातून कौतुक होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणार्‍यांनी आज
शांत रहावे.

वृश्र्चिक :–नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना पूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून सिलेक्ट झाल्याचा निरोप येईल.
उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा बेत सध्या रद्ध करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील.

धनु :–तुमच्या नवीन गुंतवणूकीचा विचार सल्ला घेऊनच करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून
चिडचिड करू नका किंवा वादही निर्माण करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा तुमचा फंडा जबरदस्त
राहील.

मकर :–घरांविषयीच्या न सुटणार्या प्रश्र्नांसाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायातील कर्जमुक्तीसाठी
तुम्हाला नवीन योजना आखाव्यात लागतील. शाळकरी मुलांना आपल्या पूर्वनियोजित कामाचा आढावा घेऊनच
पुढील अभ्यासाचे नियोजन करावे लागेल.

कुंभ :–कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची दिवसरात्र सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तरूणांचा त्यांच्या
व्यवसायाव्यतिरिक्त कांही नवीन उद्योग करायचा विचार असल्यास त्याची पूर्ण विचाराने सुरूवात करावी घाई करू
नये.

मीन :–आजचा दिवस अतिशय गतामान राहील. कामाची सांगड घालताना नाकी नऊ येतील. कोणतीही खरेदी
करताना आपण फसत नसल्याची खात्री करून घ्या. परदेशातील नोकरीचा प्रश्न विचारानेच सोडवा.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

गुरूवार 17 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 17 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 17 जून चंद्ररास सिंह 28:06 पर्यंत व नंतर कन्या.

चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 22:12 पर्यंत व नंतर उत्तरा
फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुमच्या अपेक्षेनुसार तुमची मुले शिक्षणाच्या बाबतीत तुमचा सल्ला मान्य करतील. तुम्ही पूर्वी हातउसने
दिलेले पैसे परत मिळण्याची मावळत चाललेली आशा पुन्हा जाणवू लागेल. सरकारी लायसन्स च्या बाबतीत योग्य
त्या अधिकार्याची भेट होईल.

वृषभ :–शाळकरी मुलांच्या मित्रांचे पालक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येथील. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होणार
असल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. कोणतीही आरोग्याची तक्रार जाणवल्यास लगेच डाँक्टरांचा सल्ला
घ्यावा.

मिथुन :–सामाजिक कार्यातील तुमच्या सहभागाने लोकांना आछ्चर्य वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ
ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. साहित्यिक, लेखक व कलाकार मंडळींना त्यांच्या कार्याविषयीची
पोचपावती मिळेल.

कर्क :–आज तुमच्या मनातील विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याची योग्य वेळ आलेली आहे हे लक्षांत घ्या. महिलांनी
अतीविश्र्वासाने केलेली मदत वाया जाणार नाही. स्पर्धात्मक गोष्टीत मनातील इच्छेच्या बळावर बाजी माराल.

सिंह :–आज तुमच्या स्वभावातील प्रेमळपणाचा अनुभव इतरांना येणार आहे. कुटुंबात सुना, जावई यांच्याबरोबर
सहभोजनाचा आनंद घ्याल. पतीपत्नीमधील मतभेद दूर होऊन प्रेमभावना वाढेल.

कन्या :– जवळच्या नात्यातील आजारी व्यक्तीस वेळेवर आराम न पडल्यास दवाखान्यात अँडमिट करावे लागेल व
त्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. पोलीस खात्यातील वरीष्ठांना वादग्रस्त प्रकरणे अतिशय जागरूकपणे हाताळावी
लागतील.

तूळ :–महिलांकडून केलेले नवीन उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद ठरेल. बोलण्यातील कला व आवाजाच्या
कार्यशाळेची जबाबदारी तुमच्याकडून अगदी व्यवस्थितपणे फार पडेल. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.

वृश्र्चिक :–पोस्टाच्या बचत योजनेबाबतच्या प्रचार प्रसाराच्या जबाबदारीच्या कामावरील तुमची नियुक्ती समाधान
देईल . कुटुंबातील ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली गायनाची मैफल अप्रतिम आनंद देईल.

धनु :–सकाळपासूनच्या नियोजित कामातील तुमचा सहभाग तुम्ही उत्तम रितीने फार पाडाल. शेजारील ज्येष्ठांच्या
समाधानाकरीता त्यांची इच्छा पूर्ण करावी लागेल. आर्थिक गरजेकरीता कोणाचीही मदत न घेता वेळ निभावून
न्याल.

मकर :–संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने तरूणांना आपल्या मनाला मुरड घालावी लागेल. सरकारी कागदपत्रांची फाईल
प्रवासात जीवापेक्षाही सांभाळावी लागेल. वृद्धाश्रमातील आर्थिक व्यवहारातील तुमच्या कामात पारदर्शकता ठेवावी
लागेल.

कुंभ :– शालेय विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांना आपले प्रशिक्षण आँन लाईन करता येणार आहे. बांधकाम
क्षेत्रातील कंत्राटदारांनी आर्थिक व्यवहार तपासून घ्यावेत नुकसानीची शक्यता आहे.

मीन :–मित्रांच्या मदतीने व्यवसायातील अडलेले काम मार्गी लागेल. किरकोळ विक्रेत्यांना, घरगुती लहान
उद्योगांना एकमेकांच्या ओळखीतून योग्य ती चालना मिळेल. मोकळेपणाने बोलल्यास व्यवसायवृद्धी चांगली
होईल.

||शुभंभवतु ||

 

daily horoscope

बुधवार 16 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 16 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरीष्ठ व सिनिअर्स यामधे वैचारिक वाद उफाळून येईल पण त्यात तुमच्या
मध्यस्थीने मार्गी लागेल. पोलीस व होमगार्ड क्षेत्रातील कर्मचार्‍यांवर, अधिकार्यांवर अचानक आरोप होतील.

वृषभ :–मनाविरुद्ध घटना घडताना पाहून मनाला अस्वस्थपणा येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या मनातील
विचार, महत्वाच्या सूचना यांची चर्चा करण्यास संधी मिळेल व शासकीय स्तरावर त्याची दखल घेतली जाईल.

मिथुन :–आरोग्यविषयक चर्चासत्रात तुम्हा डाँक्टर व मानसोपचार तज्ञांचे विचार बहुमोल ठरतील. प्रवासाचा
कोणताही बेत सध्या ठरवू नका. मित्रमंडळीमधे एखादी समाजहितोपयोगी योजना कार्यान्वित करण्याचे ठरेल.

कर्क :–आज तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यातून आनंद निर्माण होईल. शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याच्या
तुमच्या हेतुला लोक उचलून धरतील व त्यात सामिलही होतील. कुटुंबात नवीन मेंबरचे आगमन होणार असल्याचे
कळेल.

सिंह :–अँपेंडिक्सच्या रूग्णांना दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना व्यवहारात चालत
नाहीत याचा प्रेमवीरांनी विचार करावा. नवीन घर घेण्याचा विचार तूर्त तरी करू नका.

कन्या :–धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च होईल. वारसा हक्का बाबतची अपूर्ण राहिलेल्या कामाना प्रथम प्राधान्य द्या.
नोकरीतील तुमच्यावर न सोपवलेली जबाबदारीही तुम्हाला पार पाडावी लागेल.

तूळ :–व्यवसायात हाताखालील कर्मचार्‍यांची चांगली साथ मिळेल. लहान मुलीं आपल्या इच्छा पूर्ण करून
घेण्यासाठी हट्टाला पेटतील. अचानक महिलां भावनावश होतील व मनाची व्याकुळता वाढेल. दूर गावी असलेल्या
मुलांच्या आठवणीने दु:खी होतील.

वृश्र्चिक :–मित्रमंडळींबरोबरच्या गप्पात खिशातील रकमेपेक्षा दहापट खर्च कराल. हाँस्पिटलमधील कर्मचार्‍यांनी
तुमच्यावर असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडल्याने सर्वत्र कौतुक होईल. आरामाची आवश्यकता
वाढेल.

धनु :–विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण तणाव वाढेल. मुलांनी आपली क्षमता ओळखून अवघड विषयाकरीता वेगळ्या
शिक्षकांची सोय करावी. कोर्टातील कर्मचार्‍यांना जनतेच्या क्षोभास सहन करावे लागेल.

मकर :–आज तुम्हाला एखादा कडक निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या मनालाही पटणार नाही. पूर्ण विचाराने व
चर्चेने घेतलेले निर्णय योग्य राहतील. आजारपणातून बरे वाटलेल्यांना फार मोठ्या संकटातून वाचलो आहोत ही
भावना राहील.

कुंभ :–नोकरीतील आनंदी वातावरणाचे सर्व क्रेडीट तुम्हालाच मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या
कामाच्या वेळात किंवा कामात कोणतीही सुट घ्यावी असे वाटणार नाही. कुटुंबात अचानक आईच्या माहेरील पाहुणे
येतील.

मीन :–संततीबाबतच्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याची खात्री पटेल. ज्येष्ठ मंडळीना शालेय जीवनातील
मित्रमंडळींबरोबर संपर्क साधले जातील. आज व उद्या मोबाईल हरवण्याचा धोका आहे. तरूण ड्रायव्हर्सनी वाहनांची
वेगमर्यादा पाळावी.

||शुभंभवतु ||