|| श्री गणेशाय नमः ||
श्री गणपती अथर्वशीर्ष हे श्री गजाननाचे अत्यंत प्रभावी व फलदायी असे स्तोत्र आहे. मनापासून केलेल्या कोणत्याही कामाचे फळ मिळतच असते पण या स्तोत्राच्या पठणाने मानवाच्या ईच्छा पूर्ण होतात. श्री गजाननाच्या उपासनेत ज्यांनी आपल्या आयुष्याचे सोने केले अशा बर्याच व्यक्तींचा मला सहवास लाभला. त्यांच्याबरोबर झालेली चर्चा म्हणजे माझ्यासाठी एक नवीन दृष्टी देणारे रसायनच ठरले. त्यातूनच या अभ्यासास सुरूवात झाली व श्री गजाननाच्या कृपेने आयुष्याला वेगळे वळण मिळाले. यात माझे पहिले गुरू माझे वडील आण्णा व माझे मामा शशिकांत गद्रे यांनीही मोलाची दृष्टी दिली. त्यांना नमस्कार करून आपण या विषयाला सुरूवात करूया.
Read More