Read in
रविवार 06 जून 2021 ते शनिवार 12 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
06 जून रविवार चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 26:26 पर्यंत व नंतर भरणी.

7 जून सोमवार चंद्ररास मेष
दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 29:25 पर्यंत व नंतर कृतिका. 08 जून चंद्ररास मेष 12:22 पर्यंत व नंतर वृषभ.
चंद्रनक्षत्र कृतिका अहोरात्र. 09 जून बुधवार चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 08:43 पर्यंत व नंतर
रोहिणी. 10 जून गुरूवार चंद्ररास वृषभ 25:09 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र रोहिणी 11:43 पर्यंत व नंतर
मृगशीर्ष. 11 जून शुक्रवार चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 14:30 पर्यंत व नंतर आर्द्रा. 12 जून
शनिवार चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 16:56 पर्यंत व नंतर पुनर्वसु.
मंगळवार 08 जून रविचा मृगशीर्ष नक्षत्रात प्रवेश 06:40.
बुधवार 09 जून दर्श अमावास्या.
गुरूवार 10 जून भावुकता अमावास्या शनैश्र्वर जयंती. तसेच कंकणाकृती सूर्यग्रहण आहे पण हे भारतातून दिसणार
नाही.
मेष :–सप्ताहाच्या सुरूवातीला आजूबाजूला घडणार्या कोणत्याही नाजूक प्रसंगामुळे मन हेलावले जाईल व फारच
भावनावश होईल. इतरांचे दु:ख बघून मानसिक त्रास होईल तरी मनाला आवर घालणे महत्वाचे राहील. आजारी
तसेच मनाने नाजूक असलेल्यांना आपल्याला कांहीतरी होतय असे वाटेल पण ही मनाची अवस्था ग्रहस्थितीमुळे
आहे हे लक्षांत घ्या. महिलांनी मनातील भावना जवळच्या माणसाजवळ मोकळेपणाने व्यक्त केल्यास मनाला
हलकेपणा येईल. लहानशा प्रवास घडेल व त्यातून आनंद निर्माण होईल.
वृषभ :–या सप्ताहात नव्याने गुंतवणूक करण्याचा जराही विचार करू नका. घरापासून लांब असलेल्यांनी प्रकृतीची
आवश्यक ती काळजी घ्यावी. पुरूषांनी महिलांबरोबर, पत्नी, बहिण किंवा अगदी आईबरोबर ही वादविवाद होणार
नाही याची दक्षता घ्यावी. वडिलांकडील नात्याची चौकशी करावी. मानसिक व शारिरीक शक्तीची कमतरता
जाणवेल. कोणतेही पेडींग काम नव्याने काढू नका. हा सप्ताह कांहीसा आरामा करण्याचा आहे हे लक्षात घ्या.
एकट्याच्या विचाराने कोणताही निर्णय न घेणे बरे राहील.
मिथुन :–आपण कशातून आनंद घ्यायचा हे फक्त आणि फक्त तुमच्याच विचारावर राहील. प्रत्येक गोष्टीतील
कांहीतरी खुसपट काढून परिस्थितीतील आनंद घालवू नका. तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्याकडे कल राहिल्यास
मनाला प्रसन्न वाटेल. तरूणांनी कोणत्याही प्रलोभनाला, व्यसनाला बळी पडू नये. विद्यार्थी वर्गाने आपल्या
शिक्षणाच्या बाबतीत चोखंदळ रहावे. इतरांच्या मताचा विचार करून स्वत:च्या क्षमता तपासून मगच निर्णय घ्यावा.
कर्क :–पतीपत्नीमधील वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्या. घरातील भांडणे, वाद घरातच राहतील
याची काळजी घ्या. तुमच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी आई, पत्नी किंवा बहिणीकडनही
आर्थिक मदत मिळेल. तरी तुम्हाला त्यांना विचारायला हरकत नाही. एकत्र कुटुंबात संततीकडून मोठी मदत होईल.
वडिल भावंडाच्या व जवळच्या मित्राच्या प्रकृतीची काळजी मानसिक ताण वाढवेल व दवाखान्यासाठी धावपळ
करावी लागेल. लहान मुलांच्या डाव्या कानाला दुखापत होण्याचा धोका आहे.
सिंह :–पतीपत्नीमधील वादावर पडदा पडून पुनर्मिलन होणार असल्याचे संकेत मिळतील. घरापासून दूरवर
असणार्यांना घराची अतिशय ओढ जाणवेल. न्यायालयीन महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल.
आर्थिक व्यवहारात पारदर्शकपणा ठेवल्यास कोणत्याही कटकटीना तोंड देणे सोपे जाईल. बिघडलेल्या वाहनावर
दुरूस्तीसाठी फार खर्च करावा लागेल. घरातील बाल्कनीत लहान मुलांना एकटे सोडू नका. वयस्कर मंडळीनी रस्ता
ओलांडताना तसेच गँलरीमधून खाली वाकून बघताना स्वत:ला सांभाळावे.
कन्या :– महिलांनी चालवलेल्या व्यवसायात अतिशय चांगली वृद्धी होत असल्याचे जाणवेल. तसेत महिलांच्या
वस्तू, कपडे, दागिने यांच्या उद्योगातून अपेक्षित लाभ होईल. तरूणांना एका उद्योगातून नवीनच दुसर्या
उद्योगाची सुरूवात करण्याचे विचार सुचतील. वयस्कर मंडळींना मांड्या , गुडघेदुखीचा त्रास जाणवेल तरी दुर्लक्ष
करू नका. महिला व पुरूष दोघांनाही सासुरवाडीकडून मानसिक त्रास होणार्या घटना घडतील व वाद निर्माण होऊन
आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. या सप्ताहात खात्रीने मिळणारे पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे.
तूळ :–श्री लक्ष्मीच्या उपासकांना आपल्या उपासनेचा चमत्कार अनुभवण्यास मिळेल. बुद्धीच्या जोरावर
न्यायालयातील कामकाजात चांगली बाजी माराल. परदेशी असलेल्यांना त्यांच्या इच्छांची पूर्तता होत असल्याचे
जाणवेल. कुटुंबात आईला भेटण्यासाठी म्हणून सर्व भावंडे एकत्र येतील व लहानसा समारंभ साजरा केला जाईल.
गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट फार होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या वयस्कर मंडळीना किडनीचा त्रास
आहे त्यानी विशेष काळजी घ्यावी.
वृश्र्चिक :–दत्तक मुलावर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची फार मोठी जबाबदारी निभवावी लागेल. विवाहित मुलींना
आपल्या आईवडीलांसाठीचे कर्त्तव्य चोखपणे पार पाडण्याची संधी मिळेल. लेखक मंडळीना आपल्या पुस्तकाचे
प्रकाशन लवकरच होत असल्याची आनंदाची बातमी कळेल. बर्याच दिवसापासून रिकाम्या पडलेल्या घराला
भाडेकरू मिळेल व तुमची चिंता मिटेल. पाळीव प्राण्यांची काळजी नेहमीपेक्षा जास्तच घ्यावी लागेल. प्राण्यांच्या
राहण्याच्या जागेच्या स्वच्छतेकडे फार लक्ष देणे जरूरीच आहे.
धनु :–कुटुंबात आनंदाचे वातावरण राहिल्याने वयस्कर मंडळींच्या मनावरील ताण कमी होईल. वृद्धाश्रमात किंवा
लहान मुलांच्या संगोपन केंद्रात तुम्हाला सेवा देण्याची संधी मिळेल. सामाजिक कार्यासाठी तुमच्याकडून मोठी
आर्थिक मदत दिली जाईल. नोकरीतील अधिकार पदावर असलेल्यांना सामाजिक हिताच्या योजनांमध्ये सहभाग
घेता येईल. घरातून रागवून निघून गेलेल्या व्यक्तीला पुन्हा घरी आणण्यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य पणाला
लावावे लागेल.
मकर :–ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करणार्यांना अतिशय चांगली संधी चालून येईल व तज्ञ गुरूचा लाभ होईल.
अध्यात्मिक अभ्यासाची ओढ असणार्यांना श्री गुरूमाऊलीकडून उपदेश मिळेल व आशिर्वादही मिळेल.
उच्चरक्तदाब असलेल्यांनी प्रकृतीच्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक ताणतणाव कमी
करण्यासाठी प्राणायामाचा अभ्यास वाढवावा. शिक्षक, प्राध्यापकांना आपल्या नोकरीत अडचणी निर्माण होत
असल्याचे जाणवेल.
कुंभ :–महत्वाची कागदपत्रे, पासपोर्ट, व्हिसा तसेच इतर वैयक्तिक डाँक्युमेंटस् वेळेवर सापडणार नाहीत. व
मानसिक ताण येईल. अगदी घाई नसेल तर या सप्ताहानंतर विचार करा सर्व कांही आठवेल व सापडेल पण.
पतीपत्नीच्या व्यवसायात नव्याने काहीही न करताही प्राप्ती चांगली होईल. महिलांकडून समाजातील गरजूं करीता
मोठी आर्थिक मदत दिली जाईल. नोकरीतील गरजू घटकांकरीता कर्जाऊ रकमेची सोय तुमच्या पुढाकाराने केली
जाईल. उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचे सर्व बेत रद्ध केल्यास पुढील नुकसान टळेल.
मीन :–श्री दत्तमहाराजांच्या कृपेचा अनुभव येईल व मोठ्या संकटातून वाचाल. कोणत्याही प्रसंगी आततायीपणा करू
नका. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी हाताखालील व्यक्तीकडून मानहानीचा प्रसंग येईल पण त्यामागील कारणाचा
शोध घेतल्यास आपणच जबाबदार असल्याचे जाणवेल. कुटुंबात महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा
लागेल. वयस्कर मंडळीना आपल्या पायांचे दुखणे वाढत असल्याचा त्रास होईल. सार्वजनिक कामातील सहभाग
तुमची प्रतिष्ठा वाढवणारा ठरेल.
||शुभं-भवतु ||